• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘फोकलोक’च्या निर्मितीप्रक्रियेवर परिवर्तनचा कलावंतांशी संवाद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 17, 2026
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
‘फोकलोक’च्या निर्मितीप्रक्रियेवर परिवर्तनचा कलावंतांशी संवाद

जळगाव, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या समृद्ध कला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाला आधुनिक सादरीकरणाची जोड देत ‘फोकलोक’ या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. या निर्मितीमागील संकल्पना, प्रवास आणि अनुभव जाणून घेण्यासाठी ‘फोकलोक’च्या कलावंतांच्या टीमने जळगाव येथे ‘परिवर्तन’च्या सदस्यांशी महावीर क्लासेसच्या सभागृहात संवाद साधला. यावेळी मुकुल शिंगाडे (लेखक, दिग्दर्शक व संगीतकार), सई जोशी (संगीतकार), प्रसाद नाकील, कौस्तुभ सोनवणे, धनंजय दिघे, सिद्धांत उमव्रीकर (अभिनेता) आणि सिद्धार्थ आदी कलावंत उपस्थित होते.

या संवादादरम्यान ‘फोकलोक’च्या निर्मितीमागील भूमिका, महाराष्ट्रातील विविध लोककला व लोकपरंपरांचा शोध, त्या परंपरांना समकालीन रंगभूमीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न याबाबत कलावंतांनी सविस्तर माहिती दिली. प्रयोगशीलते मधून फोक लोक कार्यक्रमाचा जन्म, शिकत असताना आपल्याला लोकसंगीत आवडत, ते सादर करायला जमत हे कळल होत. हेच आपलं वैभव घेऊन आपण रसिकांपुढे जाऊ अस वाटल आणि आम्ही गेलो.

नाट्य व्यवसाय, त्याची गणित हे काहीही माहिती नव्हत, पण लोकांचा असा प्रतिसाद मिळाला ज्या मुळे आम्हाला मागे वळून बघावं लागलं नाही. लोककला, लोकसंगीत, लोकजीवन आणि परंपरांचे जतन करताना त्यांना आजच्या पिढीशी जोडण्याचे आव्हानही त्यांनी अधोरेखित केले. ‘फोकलोक’ची निर्मिती करताना आलेल्या विविध अडचणी, प्रयोगशीलतेचा प्रवास, कलाकारांचे अनुभव तसेच संकल्पनेपासून प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या निर्मितीपर्यंतच्या प्रक्रियेविषयी उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना कलावंतांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली.

“आपल्या मातीतल्या कला आणि लोकपरंपरा यांना सोबत घेऊन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रभावी दर्शन घडविणारा एक दर्जेदार कार्यक्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ‘फोकलोक’च्या माध्यमातून झाला आहे,” अशी भावना या संवादातून व्यक्त झाली.

याप्रसंगी ‘परिवर्तन’चे अध्यक्ष शंभू पाटील यांच्यासह अनिल कांकरिया, शिवाजी पवार, नंदलाल गादिया, विनोद पाटील, सुनीता सरकार, मंजुषा भिडे, विनोद अजनाडकर, सुरेंद्र पाटील, सुरेश पाटील, राहुल निंबाळकर, भगवान भोई, अक्षय नेहे, समृद्धी पाटील, हर्षल पाटील, निलेश पाटील, वरुण नेवे, जय सोनार, गणेश सोनार, समीक्षा पाटील आदी ‘परिवर्तन’चे सदस्य उपस्थित होते.


 

ताज्या बातम्या

‘फोकलोक’च्या निर्मितीप्रक्रियेवर परिवर्तनचा कलावंतांशी संवाद
जळगाव जिल्हा

‘फोकलोक’च्या निर्मितीप्रक्रियेवर परिवर्तनचा कलावंतांशी संवाद

August 17, 2026
धनगर समाजातील २०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
जळगाव जिल्हा

धनगर समाजातील २०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

August 17, 2026
जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2026
मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद
खान्देश

मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद

August 16, 2026
हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण
Uncategorized

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

August 16, 2026
जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात
क्रिडा

जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात

August 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add