• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बोगस पत्रकारांवर तात्काळ कारवाई करा; गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हा प्रशासनाकडे मागणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 14, 2026
in जळगाव जिल्हा
0
बोगस पत्रकारांवर तात्काळ कारवाई करा; गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हा प्रशासनाकडे मागणी

​जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात पत्रकार असल्याचे भासवून विविध शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, व्यापारी, उद्योजक तसेच इतरांना धमकावून पैसे उकळणाऱ्या तोतया व बोगस पत्रकारांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ, जळगाव जिल्हा’ यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या संदर्भात गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) जिल्हाधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.

​निवेदनात नमूद केल्यानुसार, जळगाव जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात तथाकथित तोतया पत्रकार सक्रिय झाले आहेत. कोणत्याही मान्यताप्राप्त संघटनेचे सदस्य नसताना अथवा अधिकृत नियुक्तीपत्र व वैध ओळखपत्र नसतानाही हे लोक खोट्या ओळखपत्रांच्या आधारे पत्रकारितेचा धाक दाखवून वसुली करत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. या प्रकारांमुळे मूळ आणि प्रामाणिक पत्रकारितेची नाहक बदनामी होत असून, व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

​या गंभीर बाबीची दखल घेऊन अशा बोगस पत्रकारांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील अशा संशयित व्यक्तींची स्वतंत्र यादी तयार करून त्यांच्यावर प्रशासनाने कडक देखरेख ठेवावी, अशी आग्रही विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम, संस्थापक सचिव भगवान सोनार, जिल्हाध्यक्ष चेतन वाणी आदींसह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

​हे निवेदन माहिती व पुढील योग्य त्या कारवाईसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार आणि सर्व पोलीस निरीक्षकांनाही पाठवण्यात आले आहे. प्रशासनाकडून यावर लवकरात लवकर ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा पत्रकार संघाने व्यक्त केली आहे.


 

Next Post
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक अवयवदान दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक अवयवदान दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add