• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

शेतात पिठलं-भाकरीचा घेतला आस्वाद, पातरखेडे येथे केली पिकांची पाहणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 4, 2026
in कृषी, खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय, सामाजिक
0
महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

जळगाव, प्रतिनिधी : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एरंडोल तालुक्यातील पातरखेडे येथील शेतकरी मधुकर पाटील यांच्या शेतात भेट देऊन कपाशी आणि मका पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या अडचणी, पिकांची सद्यस्थिती तसेच पिण्याचे पाणी, पीक पेरा आणि इतर अडचणींची माहिती जाणून घेतली. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून, शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.

या पहाणी दौ-यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार नंदकिशोर महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड
.(एरंडोल), संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शेताची पाहणी करतांना मंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर बसून पिठलं, भाकरीचा आस्वाद घेतला. यावेळी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष गावात उपस्थित राहून काम करीत आहेत. तलाठ्यापासून ते जिल्हाधिकारी पर्यंत तसेच कृषी सहायकापासून ते विभागातील अधिकारी आणि कर्मचारी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. दुष्काळी परिस्थिती असेपर्यंत प्रशासनाने सतर्क व तत्पर राहून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

बँकांकडून अपेक्षेच्या तुलनेत नवीन कर्जवाटप कमी झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर बँक अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कर्जवाटपाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सहकारी, राष्ट्रीयकृत तसेच खासगी बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी फोन करू नये, अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अवैध सावकारी विरोधात कारवाईचे निर्देश
एरंडोल, यावल आणि रावेर तालुक्यांत अवैध सावकारी संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन अवैध सावकारी विरोधात नियमानुसार कारवाई करण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिल्यात.


 

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add