• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

पाळधी-तरसोद बायपासवर कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने झंवर कुटुंबावर दुःखाचा डोंगर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 5, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

जळगाव, प्रतिनिधी : आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी बहिणीला घेण्यासाठी जळगावकडे येत असलेल्या तरुणाच्या दुचाकीला समोरून भरधाव येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार ललित मनोहर झंवर (३०, मूळ रा. पाळधी, ता. धरणगाव, ह.मु. प्रेमनगर, जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पाळधी-तरसोद बायपासवरील टाकळी फाट्याजवळ हा अपघात झाला.

ललित झंवर हे पिंप्राळा परिसरातील प्रेमनगर येथे कुटुंबासह राहत होते. त्यांच्या आजोबांचे ५ ऑक्टोबर रोजी वर्षश्राद्ध असल्याने कुटुंबातील सर्वजण मूळ गावी पाळधी येथे गेले होते. वर्षश्राद्धासाठी ललित यांची बहीण येणार असल्याने तिला घेण्यासाठी ते दुचाकीवरून जळगाव रेल्वेस्थानकाकडे निघाले होते.

पाळधीहून बायपासमार्गे जळगावकडे येत असताना टाकळी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ललित रस्त्यावर फेकले गेले. नागरिकांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

अपघाताची माहिती मिळताच ललित यांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांनी रुग्णालयात धाव घेतली. मृतदेह पाहताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. आमदार राजूमामा भोळे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनीही रुग्णालयात भेट देत झंवर कुटुंबीयांचे सांत्वन केले.

महामार्गावरील उड्डाणपुलाचा भराव पहिल्याच पावसात खचल्याने गेल्या दीड महिन्यापासून दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे बायपासवर सध्या एकेरी वाहतूक सुरू असून, या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. लहान-मोठे अपघात सातत्याने होत असल्याने या मार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ललित झंवर हे कुटुंबातील एकुलते एक पुत्र होते. त्यांच्या अकाली आणि दुर्दैवी मृत्यूने झंवर कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या मुलाला गमावल्याने नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान, महामार्ग दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याने बायपासवरील वाहतूक सुरक्षित करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Next Post
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

रेल्वे स्थानकावर प्रकृती खालावली अन् बांगलादेशी महिलेचे बिंग फुटले

ताज्या बातम्या

एमडी ड्रग्जचा ‘किंगपीन’ अज्जू मालेगाव पोलिसांच्या रडारवर ; अजय गारुंगेला पुरवठा केल्याचे चौकशीत उघड
खान्देश

एमडी ड्रग्जचा ‘किंगपीन’ अज्जू मालेगाव पोलिसांच्या रडारवर ; अजय गारुंगेला पुरवठा केल्याचे चौकशीत उघड

October 5, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
खान्देश

रेल्वे स्थानकावर प्रकृती खालावली अन् बांगलादेशी महिलेचे बिंग फुटले

October 5, 2026
आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू
खान्देश

आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

October 5, 2026
महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 5, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 5, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add