• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

खान्देश केळी उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे महसूलमंत्र्यांना निवेदन; पीक कर्जमाफीसह कापसाला १२ हजारांचा भाव देण्याची मागणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 4, 2026
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

जळगाव, प्रतिनिधी : अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याने जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या तांत्रिक अडचणींमध्ये न अडकवता प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे सरसकट प्रतिहेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, तसेच संपूर्ण पीक कर्जमाफी करावी, अशी मागणी खान्देश केळी उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. समितीचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केळीच्या पानावर निवेदन देण्यात आले.

जिल्ह्यात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने उडीद, मूग, सोयाबीन, मका यासह विविध खरीप पिकांना फटका बसला आहे. नुकसान झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी शेतातील पिके काढून टाकली आहेत. त्यामुळे पंचनाम्याच्या वेळी शेतात उभे पीक नसल्याने जिओ-टॅग केलेले छायाचित्र काढण्याची अडचण निर्माण होत आहे. परिणामी प्रत्यक्ष नुकसान होऊनही केवळ तांत्रिक कारणामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता समितीने व्यक्त केली आहे.

शासनाने ट्रिगर-१च्या निकषानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केले आहेत. मात्र, गावपातळीवर पंचनामे करताना येणाऱ्या अडचणी दूर करून प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित यंत्रणेला द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर विलंब न करता ३० दिवसांच्या आत नुकसानभरपाईचे वाटप सुरू करावे. पात्र शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कमही तातडीने मिळावी, अशी मागणी करण्यात आली.

आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोफत अथवा मोठ्या अनुदानावर बियाणे उपलब्ध करून द्यावे, खतांचा सुरळीत पुरवठा करावा आणि उपलब्ध पाण्यानुसार पीक नियोजनासाठी मार्गदर्शन करावे, अशी मागणी समितीने केली आहे. ठिबक व तुषार सिंचनासाठी विशेष आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली.

पीकविम्याच्या दाव्यांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत असल्याने प्रत्येक जिल्ह्यात पीक विमा अदालत आयोजित करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या ठिकाणी नाकारलेले दावे, प्रलंबित दावे आणि अन्य विमा तक्रारी प्रत्यक्ष ऐकून त्यावर तातडीने निर्णय घेण्यात यावा, असेही समितीने म्हटले आहे.

दुष्काळाच्या परिस्थितीत शेतमालाला योग्य दर मिळणेही गरजेचे असल्याचे समितीने नमूद केले. कापसाला प्रतिक्विंटल १२ हजार रुपये भाव मिळावा, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून सर्व मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी शेतकरी प्रतिनिधी प्रमोद घुगे, अशोक पाटील, प्रभाकर कोळी, लोटन सोनवणे यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.


 

ताज्या बातम्या

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
काकांच्या अंत्यविधीसाठी गावी आलेल्या तरुणाची आत्महत्या
गुन्हे

काकांच्या अंत्यविधीसाठी गावी आलेल्या तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
डिझेलच्या हेराफेरीच्या आरोपावरून महिला लिपिक निलंबित
गुन्हे

डिझेलच्या हेराफेरीच्या आरोपावरून महिला लिपिक निलंबित

October 4, 2026
धावत्या रेल्वेचा धक्का लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
गुन्हे

धावत्या रेल्वेचा धक्का लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

October 4, 2026
जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगावात वाहतुकीचे नियोजन
खान्देश

जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जळगावात वाहतुकीचे नियोजन

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add