• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सेल्फीने घेतला जीव; खदाणीतील ३० फूट खोल पाण्यात बुडून ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 8, 2026
in जळगाव जिल्हा
0
सेल्फीने घेतला जीव; खदाणीतील ३० फूट खोल पाण्यात बुडून ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

​अमळनेर, (प्रतिनिधी) : सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून खदाणीत पडणाऱ्या मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात तीन जिवलग मित्रांचा ३० फूट खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अमळनेर येथे घडली. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळील खदाणीत घडली. मानव बंटी रतनानी (१४), कार्तिक विकी उध्वानी (१४) आणि दिनेश विजय पंजवानी (१७) अशी मृत मुलांची नावे असून, हे तिघेही अमळनेर येथील सिंधी कॉलनीचे रहिवासी होते.

 

​मिळालेल्या माहितीनुसार, हे तिन्ही मित्र मंगळवारी सायंकाळी खदाणीच्या परिसरात गेले होते. खदाणीत पाण्यामध्ये एका बेटासारखा उंचवटा असून, हे तिघे पाण्यातून चालत त्या उंचवट्यावर चढले. तेथे सेल्फी काढत असताना अचानक एकाचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडू लागला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मित्राने त्याचा हात धरला, मात्र तोही खाली ओढला जाऊ लागला. शेवटी तिसऱ्या मित्रानेही त्यांना वाचवण्यासाठी हात पुढे केला, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही ३० फूट खोल पाण्यात बुडाले.

 

​हा संपूर्ण प्रकार जवळच असलेल्या एका रिक्षाचालकाच्या निदर्शनास आला. त्याने तातडीने खदाणीच्या दिशेने धाव घेतली, तर दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने तत्परता दाखवत ‘११२’ क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. ​

 

घटनेची माहिती मिळताच देवळी येथील स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, नायब तहसीलदार सी. यू. पाटील, शहर तलाठी अशपाक पिंजारी आणि पोलीस कर्मचारी गणेश पाटील तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

 

मोठ्या प्रयत्नांनंतर देवळी येथील दीपक मोरे या युवकाने पाण्यात उडी मारून तिन्ही मुलांना बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने तोपर्यंत उशीर झाला होता आणि तिन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. ​त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले, या घटनेमुळे संपूर्ण अमळनेर परिसरावर आणि सिंधी कॉलनीवर शोककळा पसरली आहे.


 

Tags: Amalner
Next Post
ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
खान्देश

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 22, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
खान्देश

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 22, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add