• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव जिल्हा निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात; १८३ खेळाडूंचा सहभाग

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 7, 2026
in क्रिडा
0
जळगाव जिल्हा निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात; १८३ खेळाडूंचा सहभाग

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या अधिकृत मान्यतेने आणि जैन स्पोर्ट्स अकादमीतर्फे आयोजित ‘जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा २०२६’ नुकतीच उत्साहात पार पडली. जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये ३ ते ५ जुलै २०२६ दरम्यान झालेल्या या स्पर्धेत जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव आणि चोपडा या तालुक्यांमधील तब्बल १८३ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत ९ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींचे एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी गट, तसेच पुरुष-महिला खुला गट आणि ३५ वर्षांवरील ज्येष्ठ खेळाडूंच्या गटांचा समावेश होता.

​स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे खजिनदार व जैन स्पोर्ट्स अकादमीचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू वृषाली पाटील, प्रशिक्षक अतुल देशपांडे आणि मुख्य पंच दीपिका ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना सुवर्ण व रजत पदके, क्रीडा साहित्य आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. जैन स्पोर्ट्स अकादमीचे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

​प्रमुख गटांतील विजेते आणि उपविजेते खेळाडू पुढीलप्रमाणे:
​९ वर्षांखालील मुली एकेरी: शनाया निलेश बोथरा (विजेती), अनुश्री विनोद पाटील (उपविजेती).
​११ वर्षांखालील मुले एकेरी: ऋत्विक प्रवीण खैरे (विजेता), अनय हेमंत पाटील (उपविजेता).
​१३ वर्षांखालील मुले एकेरी: दर्शिल राजकुमार मुनोत (विजेता), ऊर्जित उमेद रायसोनी (उपविजेता).
​१३ वर्षांखालील मुली एकेरी: तवस्मी वरून मोहता (विजेती), आरोही धीरज माहेश्वरी (उपविजेती).
​१५ वर्षांखालील मुले एकेरी: भावेश सुनील पाटील (विजेता), अनामय अमोल जोशी (उपविजेता).
​१७ वर्षांखालील मुले एकेरी: नैतिक राजेश शिंदे (विजेता), फाल्गुन राजेश पाटील (उपविजेता).
​१७ वर्षांखालील मुली एकेरी: ओवी अमोल पाटील (विजेती), पुनम ठाकूर (उपविजेती).
​१९ वर्षांखालील मुले एकेरी: वैभव विलास परदेशी (विजेता), उदित कुशल कुमार मुंदडा (उपविजेता).
​पुरुष एकेरी (खुला गट): शुभम जितेंद्र चांदसरकर (विजेता), कौशिक प्रवीण बागड (उपविजेता).
​महिला एकेरी (खुला गट): वृषाली मिठाराम धांडे (विजेती), राधिका मुकुंद बऱ्हाटे (उपविजेती).
​३५ वर्षांवरील पुरुष एकेरी: तनुज शर्मा (विजेता), अमित दुडवे (उपविजेता).
​३५ वर्षांवरील महिला एकेरी: वृषाली मिठाराम धांडे (विजेती), अनिता ध्यानी (उपविजेती).

​स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून दीपिका ठाकूर, तर इतर पंच म्हणून पूनम ठाकूर, शुभम चांदसरकर, फाल्गुन पाटील, रजत पटेल, उदित मुंदडा आणि शंतनु फालक यांनी जबाबदारी सांभाळली. प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली जैन स्पोर्ट्स अकादमीच्या स्वयंसेवकांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन व सचिव विनीत जोशी यांनी सर्व सहभागी खेळाडूंचे कौतुक करत विजेत्यांना आगामी ‘महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा चषक स्पर्धेसाठी’ शुभेच्छा दिल्या.

Tags: #sportsJalgaon
Next Post
निष्काळजी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा; ​रस्त्यांच्या दुरवस्थेवरून उपमहापौर आणि स्थायी सभापती आक्रमक

निष्काळजी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा; ​रस्त्यांच्या दुरवस्थेवरून उपमहापौर आणि स्थायी सभापती आक्रमक

ताज्या बातम्या

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
बायपास बंदमुळे ७ बळी प्रकरण : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर दबाव
जळगाव जिल्हा

बायपास बंदमुळे ७ बळी प्रकरण : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर दबाव

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add