• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

२२ चोरीच्या मोटार सायकलींसह ४ जणांना अटक; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त!

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 29, 2026
in Uncategorized
0
२२ चोरीच्या मोटार सायकलींसह ४ जणांना अटक; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त!

​मुक्ताईनगर, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या आदेशानुसार, मुक्ताईनगर पोलिसांनी वाहन चोरांच्या मुसक्या आवळण्यात मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे धडक कारवाई करत दोन सराईत चोरट्यांसह दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल २५ लाख ८० हजार रुपये किमतीच्या एकूण २२ मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत.

​याप्रकरणी पोलिसांनी (१) विशाल सुरेश सोनवणे (रा. पिंपरुड, ता. यावल, जि. जळगाव), (२) कुंदन सुनिल महाले (रा. सालबर्डी, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) आणि इतर दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला २६ जून २०२६ रोजी नोंद झालेल्या गुन्हाच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली.

​अटक करण्यात आलेल्या संशयितांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी मुक्ताईनगर येथील गुन्ह्यातील मोटार सायकलीसह इतर २१ मोटार सायकली चोरल्याची कबुली दिली. हे चोरटे विविध रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडच्या ‘पे अँड पार्क’ पार्किंगचा वापर करून चोरीच्या गाड्या तिथे उभ्या करायचे. त्यानंतर त्याच ठिकाणावरून संबंधित ग्राहकांना त्या गाड्या विकण्याची त्यांची गुन्हे करण्याची पद्धत होती. जप्त केलेल्या सर्व गाड्या महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या परिवहन विभागाकडून (RTO) नोंदणीकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

​संशयितांनी चोरलेल्या या मोटार सायकलींबाबत केवळ जळगावच नव्हे, तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसह गुजरात राज्यातही गुन्हे नोंद आहेत. यामध्ये गुजरात राज्यातील उधना (सुरत) पो.स्टे., ठाणे जिल्ह्यातील कल्याण पो.स्टे., नवी मुंबईतील नेरुळ पो.स्टे., नाशिक जिल्ह्यातील निफाड, वणी, इगतपुरी, गंगापूर, ओझर, सरकारवाडा पो.स्टे., रायगड जिल्ह्यातील नेरळ पो.स्टे. तसेच जळगाव जिल्ह्यातील पारोळा, जिल्हापेठ आणि एरंडोल पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्यांची नोंद आहे. या कारवाईमुळे अनेक ठिकाणचे वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

​सदरची धडक कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदिप गावीत, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (मुक्ताईनगर उपविभाग) केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष आडुसूळ, पोहेकॉ/ अजय खंडेराव, पोहेकॉ/महेंद्र सुरवाडे, पो.ना. असिम तडवी, पो.ना. कल्पेश आमोदकर, पो.अं. संदिप धनगर, पो.अं. सुनिल मोरे, पो.अं. चेतन महाजन, पो.अं. रविंद्र धनगर, पो.अं. प्रशांत चौधरी, पो.अं. रमेश खोडपे, पो.अं. दिपक ठाकरे, पो.अं. स्वप्निल पवार व पो.अं. अक्षय वाढे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 

Next Post
उसनवारीचे पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून महिलेवर कारमध्ये अतिप्रसंग; जळगावातील धक्कादायक घटना

उसनवारीचे पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून महिलेवर कारमध्ये अतिप्रसंग; जळगावातील धक्कादायक घटना

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add