• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अवघ्या ५ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड, दोन सराईत चोरट्यांकडून ६३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 28, 2026
in गुन्हे
0
अवघ्या ५ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड, दोन सराईत चोरट्यांकडून ६३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील शिवाजीनगर भागात झालेल्या घरफोडीचा गुन्हा जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या ५ तासांत उघडकीस आणला आहे. याप्रकरणी दोन सराईत चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीला गेलेला ६३,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

​शिवाजीनगर येथील रहिवासी सुशील भाईलाल भावसार यांच्या घरातून २५ जूनच्या रात्री ते २६ जून २०२६ च्या सकाळदरम्यान चोरट्यांनी ४२ हजार रुपये किमतीचा डेल कंपनीचा लॅपटॉप, १५ हजारांचा नोकिया अँड्रॉइड मोबाईल, सॅमसंग मोबाईल, २ किलो वजनाची पितळी कळशी आणि ३ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर शिंपी व गुन्हे शोध पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सराईत गुन्हेगार राफत शेख फिरोज (वय २०, रा. गेंदालाल मिल, जळगाव) आणि शेख शारीम शेख मुसेफ उर्फ मुसाब (वय २०, रा. सिंहगड, शिवाजीनगर हुडको, जळगाव) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींच्या घरातून लॅपटॉप, मोबाईल, पितळी कळशी आणि रोख रकमेसह संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.

​ही यशस्वी कारवाई जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील सफौ. सुनिल पाटील, सफौ. दिपक शिरसाट, पोहेकाँ. उमेश भांडारकर, पोहेकाँ. सतिष पाटील, पोहेकाँ. विरेन्द्र शिंदे, पोहेकाँ. योगेश पाटील, पोहेकाँ. नंदलाल पाटील, पोहेकाँ. भगवान पाटील, पोकाँ. अमोल ठाकुर, पोकाँ. राहुलकुमार पांचाळ, पोकाँ. प्रणय पवार व पोकाँ. भगवान मोरे यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 

Tags: #jalgaon_cityCrimePolice
Next Post
२२ चोरीच्या मोटार सायकलींसह ४ जणांना अटक; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त!

२२ चोरीच्या मोटार सायकलींसह ४ जणांना अटक; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त!

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add