• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक बीएमजी युरेथ्रोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी

मूत्रमार्ग अरुंद होण्याच्या जटिल समस्येवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून यशस्वी उपचार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 15, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक बीएमजी युरेथ्रोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव, (प्रतिनिधी) : महादेव हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागात मूत्रमार्ग अरुंद होण्याच्या जटिल समस्येवर अत्याधुनिक सिंगल स्टेज बीएमजी युरेथ्रोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला लघवीच्या त्रासातून मोठा दिलासा मिळाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील डोंगाव येथील (वय ४२ वर्षीय इसमास मूत्रमार्ग अरुंद होण्याचा त्रास होता. तपासणीनंतर त्यांना युरेथ्रल स्ट्रिक्चर असल्याचे निदान झाले. त्यांच्यावर महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सिंगल स्टेज युरेथ्रोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. बीएमजी युरेथ्रोप्लास्टी ही मूत्रमार्गाच्या अरुंद झालेल्या भागाची पुनर्रचना करण्याची आधुनिक आणि प्रभावी शस्त्रक्रिया आहे.

या प्रक्रियेत रुग्णाच्या तोंडातील आतील गालाच्या भागातील श्लेष्मल त्वचा घेऊन ती मूत्रमार्गाच्या बाधित भागावर प्रत्यारोपित केली जाते. त्यामुळे मूत्रमार्गाची रुंदी वाढून लघवीचा प्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.या प्रकारची शस्त्रक्रिया मूत्रमार्गाच्या दीर्घकालीन अरुंदतेवर प्रभावी उपाय मानली जाते. वैद्यकीय संशोधनानुसार या शस्त्रक्रियेचा यशस्वीतेचा दर ९५ टक्क्यांहून अधिक असून शस्त्रक्रियेनंतर बहुतेक रुग्णांना लघवी करताना होणारा त्रास लक्षणीयरीत्या कमी होतो.

ही शस्त्रक्रिया महादेव हॉस्पिटलच्या अनुभवी युरोलॉजी तज्ज्ञांच्या टीमने यशस्वीपणे पार पाडली. यामध्ये प्रा. डॉ. हेमंत केळकर, डॉ. हर्षद चव्हाण, डॉ. शुभम चौधरी आणि डॉ. श्रीकांत रेड्डी यांनी प्रमुख भूमिका बजावली. शस्त्रक्रियेदरम्यान अ‍ॅनेस्थेसिया विभागाकडून डॉ. रघुनाथ बारहाते व टीम, डॉ. साक्षी सांगोळे, डॉ. सुश्रिता इराबाथिनी आणि डॉ. दर्शन सूर्यवंशी यांनी मोलाचे सहकार्य केले.

अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रगत शस्त्रक्रिया पद्धती आणि उत्कृष्ट रुग्णसेवा यांच्या बळावर महादेव हॉस्पिटल युरोलॉजी क्षेत्रात दर्जेदार व विश्वासार्ह आरोग्यसेवा उपलब्ध करून देत आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय व परिचारिका कर्मचार्‍यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Next Post
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांचा निर्धार

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांचा निर्धार

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add