• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोल्ड लोन सोडवण्याच्या आमिषाने जळगावात सराफाची १८ लाखांची फसवणूक; कृउबा मार्केट कमिटी अध्यक्षांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 15, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
गोल्ड लोन सोडवण्याच्या आमिषाने जळगावात सराफाची १८ लाखांची फसवणूक; कृउबा मार्केट कमिटी अध्यक्षांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

​जळगाव, (प्रतिनिधी) : गोल्ड लोनवर तारण ठेवलेले सोने सोडवून ते मोडण्यासाठी देण्याचे आमिष दाखवत एका सराफा व्यावसायिकाची तब्बल १८ लाख १ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगाव कृउबा फळबाजार मार्केट कमिटीचे अध्यक्ष संजय अमृत महाजन यांचा मुलगा ओम संजय महाजन याच्याविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

​जोशीपेठेतील ‘ओम ज्वेलर्स’चे संचालक कृष्णा भगवान शिंदे यांची महिनाभरापूर्वी ओम महाजन याच्याशी ओळख झाली होती. ४ जून रोजी ओमने शिंदे यांना फोन करून, बजाज फायनान्समध्ये तारण ठेवलेल्या १९८ ग्रॅम सोन्यावर १९ लाखांचे गोल्ड लोन असल्याचे सांगितले. हे लोन फेडून दागिने मोडायचे आहेत, असे सांगत त्याने तत्कालीन बँक व्यवस्थापकाचे नाव घेऊन शिंदे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ५ जून रोजी ओमने दुकानात येत तातडीने १९ लाख रुपयांची मागणी केली. शिंदे यांनी तात्पुरती व्यवस्था करून ६ जून रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून १९ लाख रुपये ओम महाजनच्या खात्यात जमा केले.

​रक्कम खात्यात वर्ग झाल्यानंतर ओमने तांत्रिक अडचणी, केवायसी नसणे आणि खाते सीझ झाल्याची कारणे पुढे करत वेळकाढूपणा सुरू केला. त्यानंतर त्याने ८ जून रोजी शिंदे यांच्या खात्यात केवळ ९९ हजार रुपये ऑनलाइन जमा केले; मात्र उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ करत फोन उचलणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिंदे यांनी ओमच्या वडिलांची भेट घेतली, मात्र तिथूनही ठोस प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी शनिपेठ पोलिसांत धाव घेतली.

दरम्यान, ओम महाजन याने सराफ बाजारातील इतर ३ ते ४ व्यावसायिकांचीही अशाच प्रकारे लाखोंची फसवणूक केल्याची चर्चा असून, या गुन्ह्यामुळे जळगावात खळबळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Tags: #jalgaon_city#jewelleryCrimePolice
Next Post
महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक बीएमजी युरेथ्रोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक बीएमजी युरेथ्रोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add