• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात २२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 10, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगावात २२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने आज एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्यात विक्री, वाहतूक व साठवणुकीस पूर्णपणे प्रतिबंधित असलेला तब्बल २१ लाख ६१ हजार ६०० रुपये किमतीचा विमल सुगंधित गुटखा आणि पानमसाला यासह ७ लाख रुपयांचे चारचाकी मालवाहू वाहन, असा एकूण २८ लाख ६१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

​पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना ९ जून २०२६ रोजी एक गोपनीय बातमी मिळाली की, जळगाव शहरातून महामार्गाने प्रतिबंधित गुटख्याची मोठी वाहतूक होणार आहे. या खात्रीशीर माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक विशेष पथक तातडीने तयार करण्यात आले.

​या पथकाने अजंठा चौक ते इच्छादेवी चौक दरम्यान असलेल्या डिझो पेट्रोल पंप परिसरात संशयित वाहनांची पाळत ठेवून पाहणी सुरू केली. दरम्यान, एक चारचाकी मालवाहू वाहन संशयास्पद रित्या येताना दिसल्याने पोलिसांनी ते थांबवून त्याची कसून तपासणी केली. या तपासणी दरम्यान महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. एमएच १९ सीएक्स ३२६०) मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल सुगंधित गुटखा व पानमसाला ठासून भरलेला आढळला.

​पोलिसांनी कारवाई दरम्यान २१,६१,६००/- रुपये किमतीच्या एकूण ५८ गोण्या प्रतिबंधित गुटखा आणि ७,००,०००/- रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप, असा एकूण २८ लाख ६१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला.

​याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात वाहन चालक जोगेंद्र भिका पाटील (रा. फुलपाट, ता. धरणगाव, जि. जळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहेत.

​सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ गिरीश पाटील आणि पोहेकॉ लाडवंजारी यांच्या पथकाने केली आहे.

Tags: #jalgaon_cityCrimePolice
Next Post
लग्नातील वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; पोलिसात ८ जणांवर गुन्हे दाखल!

लग्नातील वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; पोलिसात ८ जणांवर गुन्हे दाखल!

ताज्या बातम्या

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
जळगाव जिल्हा

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज
जळगाव जिल्हा

विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज

September 14, 2026
‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला
खान्देश

‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला

September 13, 2026
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 
जळगाव जिल्हा

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
खान्देश

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

September 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add