• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लग्नातील वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; पोलिसात ८ जणांवर गुन्हे दाखल!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 10, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
लग्नातील वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; पोलिसात ८ जणांवर गुन्हे दाखल!

जळगाव, (प्रतिनिधी) : लग्नामध्ये झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान दोन गटांमधील भीषण हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना जळगाव जवळील नशिराबाद येथे घडली आहे. या वादात दोन्ही गटांकडून एकमेकांवर तलवार, लोखंडी पाईप आणि आसाारीने (धारदार हत्यार) जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या परस्परांविरोधी तक्रारींवरून एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना ६ जून रोजी घडली असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथे एका विवाह सोहळ्यादरम्यान दोन गटात वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून दोन्ही गट आमनेसामने आले आणि त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली.

​याप्रकरणी पहिली फिर्याद सय्यद वसीम सय्यद बिस्मिल्ला (वय ३४, रा. नशिराबाद, ता. जळगाव) यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ६ जून रोजी लग्नाच्या जेवणाच्या पंगतीत त्यांचा लहान भाऊ झाडत (सफाई करत) असताना, त्याने तिथे उभे असलेल्या एका व्यक्तीला बाजूला होण्यास सांगितले. यावरून तिथे उपस्थित असलेल्या काही जणांनी वाद घालत त्यांना बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर तलवार आणि आसारीसारख्या घातक हत्यारांनी त्यांच्यावर वार करून जखमी केले. या तक्रारीवरून नशिराबाद पोलिसांनी दुसऱ्या गटातील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

​याच घटनेप्रकरणी दुसरी परस्परांविरोधी फिर्याद मोहम्मद रफीक अब्दुल हक (वय ४६, रा. नशिराबाद, ता. जळगाव) यांनी दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, लग्नात झालेल्या जुन्या वादाच्या कारणावरून दुसऱ्या गटातील चार जणांनी त्यांना रस्त्यात अडवून बेदम शिवीगाळ केली. तसेच लोखंडी पाईपने त्यांच्यावर जबर हल्ला चढवून गंभीर मारहाण केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी पहिल्या गटातील चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

​लग्नातील आनंदाच्या वातावरणात झालेल्या या रक्तरंजित हाणामारीमुळे नशिराबाद परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या एकूण ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास नशिराबाद पोलीस करत आहेत.

Tags: #jalgaondistrictCrimePolice
Next Post
जळगावकरांना वीज संकटातून मुक्त करा; उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतींचे महावितरणसह मनपा प्रशासनाला आदेश

जळगावकरांना वीज संकटातून मुक्त करा; उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतींचे महावितरणसह मनपा प्रशासनाला आदेश

ताज्या बातम्या

आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात
शैक्षणिक

आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
आषाढी एकादशीनिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये भक्तिमय जल्लोष
जळगाव जिल्हा

आषाढी एकादशीनिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये भक्तिमय जल्लोष

July 25, 2026
विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात
जळगाव जिल्हा

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 24, 2026
निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲप; शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲप; शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन

July 24, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे हरीत यज्ञ उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे हरीत यज्ञ उत्साहात

July 24, 2026
मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार
आरोग्य

मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार

July 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add