• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

दिंडी, पालखी, नाटिकेतून वारकरी संस्कृतीची ओळख; ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा हरित संदेश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 24, 2026
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

जळगाव, (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल (प्रायमरी) व अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल (सेकंडरी) येथे दिंडी सोहळा आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी व दिंडीत सहभागी होत प्रत्यक्ष वारीचा आनंद अनुभवला.

यावेळी विद्यार्थ्यांनी “पंढरीचा पांडुरंग विटेवर का उभा आहे?” या विषयावर आधारित विशेष नाटिका सादर केली. या नाटिकेतून वारकरी संप्रदायाचा इतिहास, संत परंपरा, भक्ती आणि विठ्ठलभक्तीचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. शाळेच्या प्राचार्या रेश्मी लाहोटी यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना पालखी, दिंडी आणि वारीचे सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगण्यात आले.

महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेची ओळख करून देतानाच भक्ती, समता, सेवा आणि संस्कार यांचे महत्त्वही विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. यंदाच्या दिंडी सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा संदेश. दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी “झाडे लावा, झाडे जगवा” चा जयघोष करत हरित पर्यावरणाची जनजागृती केली. भक्तीबरोबरच पर्यावरण संरक्षणाची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारावी, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

अनुभूती स्कूल च्या संचालिका निशा जैन, प्राचार्य रेश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर सोनवणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. वारीची अनुभूती देणारी नाटिका वैशाली दुसाने यांनी साकारली, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री कासार यांनी केले. विठ्ठलनामाच्या अखंड गजराने आणि भक्तिरसाने संपूर्ण शाळा परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.


 

Next Post
आषाढी एकादशीनिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये भक्तिमय जल्लोष

आषाढी एकादशीनिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये भक्तिमय जल्लोष

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add