• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे हरीत यज्ञ उत्साहात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 24, 2026
in जळगाव जिल्हा
0
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे हरीत यज्ञ उत्साहात

जळगाव, (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धनाची जाणीव समाजात रुजविण्यासाठी आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे नाशिराबाद येथे हरीत यज्ञ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

या उपक्रमात प्रा. अँजेला एलिस, प्रा.निलेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनानुसार चतुर्थ वर्ष विद्यार्थी, प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.हरीत यज्ञाची सुरुवात पर्यावरण संरक्षणाच्या सामूहिक संकल्पाने झाली. यावेळी पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी हवामान बदल, वृक्षसंवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि प्रदूषणमुक्त पर्यावरण या विषयांवर आकर्षक व आशयपूर्ण पोस्टर्स सादर करून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला.

त्यानंतर जनजागृती मार्गदर्शन व आरोग्य शिक्षण सत्रात वृक्षांचे मानवी आरोग्य, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकासातील महत्त्व, वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जनजागृती रॅली हे विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक घोषणा देत नाशिराबाद परिसरात फेरी काढली. “झाडे लावा, झाडे जगवा”, “हरित पृथ्वी, निरोगी जीवन”, “एक विद्यार्थी — एक वृक्ष” अशा घोषणांमुळे परिसर दुमदुमून गेला. रॅलीद्वारे नागरिकांना वृक्षलागवडीचे महत्त्व पटवून देत पर्यावरण संरक्षणासाठी सक्रिय सहभागाचे आवाहन करण्यात आले.

यानंतर परिसरात विविध प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी स्वीकारली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. “आज एक वृक्ष लावा.. उद्याचे भविष्य वाचवा” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


 

Next Post
निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲप; शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन

निवृत्तीवेतनधारकांसाठी 'महा-उपलब्धी' मोबाईल ॲप; शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add