• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲप; शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 24, 2026
in जळगाव जिल्हा
0
निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲप; शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव, (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागांतर्गत लेखा व कोषागारे संचालनालयामार्फत राज्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ हे सर्वसमावेशक मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारकांना आवश्यक माहिती व विविध सेवा एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

‘महा-उपलब्धी’ ॲपमध्ये मासिक निवृत्तीवेतन देयकांचा तपशील (Monthly Payment History) पाहण्याची सुविधा, आयकर प्रमाणपत्र (फॉर्म-१६) डाउनलोड करण्याची सुविधा, ई-पीपीओ (e-PPO) लायब्ररी पाहण्याची सुविधा, जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) कोषागार कार्यालयास सादर करण्याची सुविधा तसेच निवृत्तीवेतन विषयक महत्त्वाचे शासन निर्णय (Pension GR) पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.

या ॲपमध्ये निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पडताळणी करून किंवा पीपीओ क्रमांकाद्वारे सुरक्षितपणे लॉगिन करता येते.

जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून ‘महा-उपलब्धी’ ॲप डाउनलोड करून उपलब्ध डिजिटल सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी माधव थैल यांनी केले आहे.


 

Next Post
विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add