• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात युवक काँग्रेसचे आंदोलन; ‘नीट’च्या विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवासाची मागणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 25, 2026
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
जळगावात युवक काँग्रेसचे आंदोलन; ‘नीट’च्या विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवासाची मागणी

​जळगाव, (प्रतिनिधी) : भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य, विद्यार्थी आणि शेतकरी भरडले जात असल्याचा आरोप करत रविवारी २४ मे रोजी जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शास्त्री टॉवर चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी, काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष जमील शेख यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी अभिलाष तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक काँग्रेसची मासिक आढावा बैठक पार पडली.

​या आंदोलनात युवक काँग्रेसने मुख्यत्वे तीन मुद्दे लावून धरले. ‘नीट’ (NEET) परीक्षा घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून, पेपर फोडणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच घोटाळ्यामुळे आत्महत्या केलेल्या चार विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहून, पुनःपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा द्यावी, अशी मागणी जमील शेख यांनी केली.

​दुसऱ्या बाजूला, दररोज छुप्या पद्धतीने होत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबद्दल आणि इंधन तुटवड्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. ऐन पेरणीच्या दिवसांत शेतकऱ्यांना खते आणि डिझेलची तीव्र टंचाई जाणवत असून, याला सरकारच जबाबदार असल्याचा ठराव बैठकीत करण्यात आला. प्रभारी अभिलाष तायडे यांनी युवकांना संघटन मजबूत करून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मैदानात उतरण्याचे आवाहन केले.

​या वेळी प्रदेश सचिव किरण पाटील, आशुतोष पवार, तुषार संदानशिव, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष महेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष मुजीब पटेल, सलमान तडवी, गौरव देशमुख, रोहन सुर्यवंशी, मनोहर महाले, प्रज्वल राजपूत यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Tags: #jalgaon_city#political
Next Post
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘स्मार्ट’ कंपनीचा मनमानी कारभार

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 'स्मार्ट' कंपनीचा मनमानी कारभार

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add