• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 21, 2026
in जळगाव जिल्हा
0
मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

जळगाव, (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्रीराम मंदिर संस्थान, जुने जळगाव यांच्या वतीने आयोजित श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळा जळगाव ते पंढरपूर व पंढरपूर ते जळगाव असा सुमारे ५४ दिवसांचा ११०० किलोमीटरचा पदयात्रा सोहळा भक्तिमय वातावरणात सुरू आहे. ह.भ.प. मंगेश महाराज जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ३०० वारकरी भक्त या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत.

या पवित्र वारीदरम्यान कंदर येथे मेहरूनचे माजी नगरसेवक प्रशांत नाईक, सुनील वंजारी, नामदेव नाईक आणि विलास घुगे यांनी ह.भ.प. मंगेश महाराज जोशी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराजांनी सर्वांची प्रेमपूर्वक विचारपूस करून आशीर्वाद दिला तसेच वारकरी संप्रदायातील भक्ती, सेवा आणि समाजप्रबोधनाचे महत्त्व सांगितले. उपस्थितांनीही महाराजांशी स्नेहपूर्ण संवाद साधत त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

या अविस्मरणीय भेटीमुळे मेहरूनच्या ग्रामस्थांना पूज्य महाराजांचे दर्शन व आशीर्वाद लाभल्याची भावना व्यक्त करण्यात आली. श्री विठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना करत ह.भ.प. मंगेश महाराज जोशी यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली धर्म, संस्कृती आणि वारकरी परंपरेची सेवा अधिकाधिक वृद्धिंगत होत राहावी, अशी प्रार्थना उपस्थितांनी केली.

Next Post
देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

ताज्या बातम्या

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी
Uncategorized

जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी

September 4, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
खान्देश

जि.प.च्या १५ शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर

September 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add