• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘स्मार्ट’ कंपनीचा मनमानी कारभार

कामगारांना कामावरून काढल्याने माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांचा उपोषणाचा इशारा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 26, 2026
in जळगाव जिल्हा
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘स्मार्ट’ कंपनीचा मनमानी कारभार

​जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (GMC) स्वच्छता व इतर दैनंदिन कामांचा मक्ता घेतलेल्या ‘स्मार्ट’ कंपनीच्या मनमानी कारभाराविरुद्ध आता तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कंपनीने कोणत्याही कारणाशिवाय ‘साई मल्टी सर्व्हिसेस’च्या ६० ते ८० कंत्राटी कामगारांना अचानक कामावरून कमी केल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कामगारांना त्वरित कामावर रुजू करून घ्यावे, अन्यथा त्यांच्या कुटुंबियांसह अधिष्ठाता (डीन) कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

​अधिष्ठाता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रुग्णालयात स्वच्छतेचे काम पाहणाऱ्या कंत्राटी कामगारांनी कोरोना काळापासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपली सेवा दिली आहे. मात्र, संबंधित मक्तेदाराने गेल्या ३-४ दिवसांपासून अचानक काम बंद केल्याने रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच सुशिक्षित तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर रकमा वसूल केल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदा करण्यात यावे, अशी मागणीही लाडवंजारी यांनी केली आहे.

​जिल्ह्याला तीन मंत्री, तरीही न्यूरोसर्जन मिळेना!..
​या निवेदनात जळगाव जिल्ह्याच्या वैद्यकीय सुविधांमधील त्रुटींवरही बोट ठेवण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्याला तीन मंत्रीपदे मिळालेली असतानाही, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अद्यापपर्यंत ‘न्यूरोसर्जन’ उपलब्ध नाही. यामुळे गंभीर रुग्णांचे प्रचंड हाल होत असून, त्यांना उपचारासाठी इतर शहरात धाव घ्यावी लागत आहे. रुग्णालयात तात्काळ न्यूरोसर्जनची नियुक्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, राजु मोरे, सुनील माळी आणि जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत यांनी दिला आहे.

Tags: #jalgaon_city
Next Post
तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला ‘अन्न व औषध प्रशासन’ आयुक्तपदाचा कार्यभार

तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला ‘अन्न व औषध प्रशासन’ आयुक्तपदाचा कार्यभार

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add