• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 22, 2026
in मनोरंजन
0
‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!

जळगाव, (प्रतिनिधी) : नाट्यरंग जळगाव निर्मित, विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि मूल्ये रुजवणारे अत्यंत लोकप्रिय बालनाट्य ‘गाठोड्याचं गुपित’ याचा २८ वा प्रयोग पद्मालय इंग्लिश मीडियम स्कूल, शिरसोली येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संस्थेच्या वतीने हा प्रयोग विद्यार्थ्यांना पूर्णपणे विनामूल्य दाखवण्यात आला, ज्याचा शाळेतील सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद देत आनंद घेतला.

‘गाठोड्याचं गुपित’ हे केवळ मनोरंजक नाटक नसून, विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर नैतिक मूल्यांचे संस्कार घडवणारे, जीवनमूल्यांची जाणीव करून देणारे आणि अंतर्मूल्यांचे आकलन घडवणारे एक प्रभावी माध्यम ठरत आहे. याचे विचारप्रवर्तक कथानक आणि हृदयस्पर्शी मांडणी यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक व पालकांकडूनही या बालनाट्याला मोठी पसंती मिळत आहे.

राज्यस्तरावरील विविध नाट्यस्पर्धांमध्ये अनेक प्रतिष्ठित पारितोषिकांनी गौरविण्यात आलेल्या या बालनाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन नाट्यरंग जळगाव संस्थेचे संचालक अमोल अरुण ठाकूर यांनी केले आहे. दर्जेदार आशय, प्रभावी सादरीकरण आणि उत्तम संदेश यामुळे या बालनाट्याचा यशस्वी प्रवास अविरत सुरू असून, शिरसोली येथील प्रयोगही विद्यार्थ्यांच्या अफाट दाद मिळवत संस्मरणीय ठरला.

या नाटकात प्रभूदत्त दुसाने आणि राशी पडलवार या दोन प्रतिभावान बालकलावंतांनी आपल्या सुरेख अभिनयाने रंगमंच गाजवला. तसेच, नाटकाची रंगमंच व्यवस्था प्रणित जाधव, पीयूष भुक्तार, प्रणव जाधव, अथर्व रंधे आणि दिशा ठाकूर यांनी अत्यंत यशस्वीरीत्या सांभाळली.

संस्थेचे संचालक निषादराज रंगराव बारी आणि अध्यक्षा श्रीमती भारती रंगराव बारी यांच्या विशेष प्रयत्नांतून हा प्रयोग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती चौधरी यांनी कलावंतांच्या संपूर्ण संघाचे कौतुक केले. या प्रसंगी शाळेतील इतर शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next Post
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

ताज्या बातम्या

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी
Uncategorized

जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी

September 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add