• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध कृषी अभ्यासक्रमांसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 22, 2026
in शैक्षणिक
0
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

जळगाव, (प्रतिनिधी) : डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (धउचजण), नाशिक संलग्न विविध कृषी शिक्षणक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या जुलै २०२६ प्रवेश प्रक्रियेनुसार कृषी शिक्षणक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत.

महाविद्यालयामार्फत कृषी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कृषी अधिष्ठान अभ्यासक्रम, उद्यानविद्या पदविका, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी पत्रकारिता, फळ उत्पादन, भाजीपाला उत्पादन तसेच फ्लोरीकल्चर व लँडस्केप गार्डनिंग यांसारखे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम शेतकरी, विद्यार्थी, कृषी उद्योजक तसेच कृषी क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍या युवकांसाठी उपयुक्त ठरणार आहेत.

महाविद्यालयाची विशेष बाब म्हणजे आठवड्यातील शनिवार व रविवारी प्रत्यक्ष प्रशिक्षण, अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, आधुनिक शैक्षणिक सुविधा, डिजिटल शिक्षण व्यवस्था आणि प्रत्यक्ष शेतीतील कौशल्य विकासावर भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक अनुभवही मिळतो.

अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कृषी सेवा केंद्र परवाना मिळविण्यासाठी आवश्यक पात्रता, विविध शासकीय व निमशासकीय नोकर्‍यांच्या संधी तसेच कृषी व्यवसाय, कृषी उद्योग, फलोत्पादन, भाजीपाला उत्पादन आणि स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात, अशी माहिती महाविद्यालयाकडून देण्यात आली आहे.

प्रवेशासाठी जातीचा दाखला (लागू असल्यास), नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास), दहावी गुणपत्रिका, टी.सी., आधार कार्ड, पॅन कार्ड, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, छायाचित्र व स्वाक्षरी आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे संपर्क साधून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.

Next Post
कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

ताज्या बातम्या

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी
Uncategorized

जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी

September 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add