• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एस.टी. आरक्षणासाठी नेमलेल्या समितीच्या कामाचा हिशोब द्या; गोर सेनेचे राज्यभर आंदोलन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 8, 2026
in सामाजिक
0
एस.टी. आरक्षणासाठी नेमलेल्या समितीच्या कामाचा हिशोब द्या; गोर सेनेचे राज्यभर आंदोलन

जळगाव, (​प्रतिनिधी) : गोरबंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या ‘तहलियानी समिती’ने गेल्या पाच महिन्यांत नेमके काय काम केले, याचा आढावा जाहीर करावा, या मागणीसाठी गोर सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभरात ३०० हून अधिक ठिकाणी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदने देऊन सरकारचा निषेध करण्यात आला.

​गेल्या वर्षी गोरबंजारा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ५५ महामोर्चे काढले होते. समृद्धी महामार्गावरील रास्ता रोको आणि आंदोलनांच्या तीव्रतेनंतर, ४ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश तहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमण्याचा निर्णय झाला होता. मात्र, पाच महिने उलटूनही या समितीच्या कामकाजाची कोणतीही माहिती समोर न आल्याने समाजात संतापाची लाट आहे.

​”समितीने नेमका काय अभ्यास केला की ही समिती केवळ कागदापुरतीच मर्यादित आहे?” असा सवाल प्रा. संदेश चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. बंजारा समाजाची स्वतंत्र संस्कृती, ‘गोरधाटी’, तांडा वस्ती आणि आर्थिक मागासलेपण ही आदिम संस्कृतीची लक्षणे आहेत. देशातील इतर राज्यांत या समाजाला एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण असताना महाराष्ट्रात मात्र अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे. या लढ्यात पाच तरुणांनी बलिदान दिले असूनही सरकार चालढकल करत असल्याचा आरोप गोर सेनेने केला आहे.

​दरम्यान जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अर्जुन जाधव, सचिव चेतन जाधव, तालुकाध्यक्ष योगेश राठोड, प्रवीण चव्हाण, किशोर चव्हाण यांच्यासह गोर सेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. समितीच्या कामाचा अहवाल तातडीने मांडला नाही, तर आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

Next Post
आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

ताज्या बातम्या

जामनेर पंचायत समितीचा तांत्रिक सहाय्यक ३० हजारांची लाच मागताना जाळ्यात
गुन्हे

जामनेर पंचायत समितीचा तांत्रिक सहाय्यक ३० हजारांची लाच मागताना जाळ्यात

June 22, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा
आरोग्य

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा

June 22, 2026
गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
आरोग्य

गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 22, 2026
जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत कुणाला किती मते मिळाली पहा!
जळगाव जिल्हा

जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत कुणाला किती मते मिळाली पहा!

June 22, 2026
जळगाव विधान परिषद निवडणूक: महायुतीचे नंदकिशोर महाजन ५७७ मतांनी विजयी!
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषद निवडणूक: महायुतीचे नंदकिशोर महाजन ५७७ मतांनी विजयी!

June 22, 2026
चाकू हल्ला करून लुटणारी टोळी जेरबंद; तालुका पोलिसांची धडक कारवाई
गुन्हे

चाकू हल्ला करून लुटणारी टोळी जेरबंद; तालुका पोलिसांची धडक कारवाई

June 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group