• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पद्मालय येथे अंगारकी चतुर्थीचा उत्साह; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते महापूजा संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 5, 2026
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
पद्मालय येथे अंगारकी चतुर्थीचा उत्साह; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते महापूजा संपन्न

जळगाव, (प्रतिनिधी) : पद्मालय गणपती मंदिर येथे अंगारकी चतुर्थीच्या पावन निमित्ताने पहाटेच्या मंगलमय वातावरणात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक, विधिवत पूजा व आरती संपन्न झाली. पहाटे ४ वाजता पार पडलेल्या या पूजेमुळे मंदिर परिसर भक्तिमय झाला होता.

पद्मालय हे गणपतीचे अत्यंत प्राचीन व जागृत स्थान मानले जाते. विशेष म्हणजे डाव्या व उजव्या सोंडेचे गणपती एकाच ठिकाणी विराजमान असलेले हे देशातील एकमेव मंदिर आहे. संकष्टी, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पद्मालय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करुन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज पहाटे विधिवत पूजा व आरती केली. व त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी मंदिराचे पुजारी गणेश वैद्य व केशवराव पुराणिक यांनी विधीपूर्वक पूजा सांगितली. पूजा संपल्यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मंदिराचा इतिहास तसेच सुरू असलेल्या विकास कामांची माहिती घेतली.

श्री गणपती मंदिर देवस्थान पद्मालय ट्रस्टतर्फे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा शाल व गणरायाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विश्वस्त आनंदराव पाटील, भिका पाटील, गोकुळ देशमुख, डॉ. पांडुरंग पिंगळे, राजेश तिवारी, अर्जुन पाटील, शिरीष बर्वे यांच्यासह तहसीलदार गोपाल पाटील, जैन इरिगेशनचे अनिल जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते. देवस्थानचे सहकारी अशोक पाटील व जोशी यांनी पूजेचे नियोजन केले.

संकष्टी, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पद्मालय येथे होणारा हा धार्मिक सोहळा भाविकांसाठी श्रद्धेचा असतो. उन्हाची तिव्रता लक्षात घेता भाविकांसाठी पद्मालय देवस्थान तर्फे सावलीसाठी मंडपाची तसेच कुलर व थंड पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात येते.

Tags: #jalgaon_city
Next Post
शिरसोलीत बंद घर फोडून ५ लाखांचा ऐवज लंपास; स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला

शिरसोलीत बंद घर फोडून ५ लाखांचा ऐवज लंपास; स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला

ताज्या बातम्या

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 8, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 8, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 8, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add