• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

गांधी रिसर्च फाउंडेशनचा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 1, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

जळगाव, (प्रतिनिधी) : “महात्मा गांधीजींचे विचार कालही प्रासंगिक होते, आजही आहेत आणि येणाऱ्या काळात दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरणार आहेत, महात्मा गांधी हे लाईट हाऊसच आहेत.” असे महत्त्वपूर्ण विचार डॉ. प्रशांत बोकारे यांनी गांधी रिसर्च फाउंडेशनच्या पदवी प्रदान समारंभात दीक्षांत भाषणात व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत एस.बोकारे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन अय्यंगार, गीता धर्मपाल हे मान्यवर उपस्थित होते.

गांधी रिसर्च फाउंडेशनच्या पदवी अभ्यासक्रमासाठी ९ राज्यांतील १६ म्हणजे ६ विद्यार्थीनी व १० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यातील रूपक दास, राखी कुमारी, सुशील, रजत यांनी अनुभव व्यक्त केले. यावेळी डॉक्युमेंटरी देखील प्रदर्शीत केली होती. यानंतर गीता धर्मपाल यांनीदेखील विद्यार्थ्यांना उद्देशून भाषण केले.

आपल्या भाषणात डॉ. बोकारे म्हणाले की, आज ‘उपयोगी’ विषयांपुरती मर्यादित शिक्षण ही एक प्रकारची डिक्टेटरशिप तयार होत असल्याचे सांगून त्यांनी गांधी विचारांच्या प्रासंगिकतेवर जोर दिला. “गांधी विचार वाचायचे असतील तर विचारले जाईल, ‘यातून कारखाना चालेल का? इंटरनेट चालेल का? मार्केटिंग होईल का?’ असा प्रश्न. स्वातंत्र्याचा अर्थ फक्त इंग्रजांचा निघून जाणे नव्हे, तर विचारस्वातंत्र्य आहे,” असे ते म्हणाले. तंत्रज्ञानाच्या नावाखालील ‘ज्ञानतंत्रशाही’पासून मुक्ती मिळवावी, अन्यथा खरी स्वातंत्र्य फसवे ठरेल, असा इशारा त्यांनी दिला. लंडनच्या राऊंड टेबल कॉन्फरन्सवेळी मँचेस्टरच्या इंडस्ट्रियलिस्टांनी गांधींना विचारले, “चरखा चालवून आमचा कपडा बाजार कसा वाचवणार?” गांधींनी उत्तर दिले, “माझ्या देशाला फाईन कपड्यांची गरज नाही, कपडा पहाण्याची गरज आहे.” डॉ. बोकारे म्हणाले, चरख्याने ग्रामीण महिलांना रोज ६ ते ८ आण्यांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले, जे आर्थिक आत्मनिर्भरतेचे प्रतीक होते. आजही ग्रामोद्योगातून ही तत्त्वे लागू करता येतील.

एकल चळवळीतर्फे ५५० ग्रामसभांपर्यंत पोहोचून बायोडायवर्सिटी अॅक्ट आणि फॉरेस्ट राइट अॅक्टबाबत ग्रामस्थांना शिकवले जात असल्याचे डॉ. बोकारे यांनी सांगितले. पुण्याच्या गोखले संस्थेतील ३०० वर्षे जुना वटवृक्षाखाली जेवताना त्यांना गांधी-गोखले यांची भेट जाणवली. “वर्धा येथील गांधी आश्रमाशी माझा निकट संबंध आहे,” असे सांगत त्यांनी ग्रामीण विकासासाठी प्रेरणा घेतली. “गांधी हे लाईटहाऊस आहेत, त्यांना कस्टमाईज करा. त्यांचे विचार आजही, उद्या आणि ५० वर्षांनंतरही अधिक प्रासंगिक राहतील,” असे प्रतिपादन डॉ. बोकारे यांनी केले. ग्रामीण भागात नशामुक्ती, ग्रामशिक्षण यांसारख्या टूल्सचा उपयोग करून गांधी तत्त्वे राबवावीत, असे आवाहन त्यांनी केलं.

अध्यक्षीय भाषणात डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी शिक्षणाची तुलना दगड कोरण्याच्या प्रक्रियेशी करून सांगितले आहे की, विद्यालय हे केवळ ज्ञान देणारे ठिकाण नसून व्यक्तिमत्त्व घडवणारे “तक्षशिला” आहे, जिथे गांधी विचारांच्या छिन्नी-हातोड्याने विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न होतो. हीच संकल्पना गांधीतीर्थचे निर्माते श्रद्धेय भवरलालजी जैन यांची हे तीर्थ निर्माण करण्यामागे होते. आजच्या वाढत्या हिंसक आणि अस्थिर जगात गांधी विचारांची उपयुक्तता कमी होत असल्यासारखी वाटत असली तरी विद्यार्थ्यांनी विचार आणि कृती यांचा समतोल राखून जगाला अधिक चांगले बनवण्याची जबाबदारी घ्यावी, असा संदेश दिला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अश्विन झाला यांनी तर आभारप्रदर्शन दीपक मिश्रा यांनी केले.


 

Tags: #Gandhiresearchfoundation
Next Post
जळगाव पोलीस दलाची मान उंचावली; ५ अधिकारी व २३ अंमलदारांना ‘डीजी इन्सिग्निया’ सन्मानचिन्ह

जळगाव पोलीस दलाची मान उंचावली; ५ अधिकारी व २३ अंमलदारांना ‘डीजी इन्सिग्निया’ सन्मानचिन्ह

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add