• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

JCL T-20: अमळनेर सुहांस जायंट्स, रावेर रॉयल्स आणि चाळीसगाव चॅलेंजर्सची विजयी घोडदौड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 22, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
JCL T-20: अमळनेर सुहांस जायंट्स, रावेर रॉयल्स आणि चाळीसगाव चॅलेंजर्सची विजयी घोडदौड

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित ‘जळगाव क्रिकेट लिग-२०२६’ (JCL T-20) स्पर्धा आता निर्णायक टप्प्यात आली आहे. बुधवारी झालेल्या चुरशीच्या लढतींमध्ये अमळनेर सुहांस जायंट्स आणि रावेर रॉयल्स या संघांनी बाजी मारली, तर तत्पूर्वी झालेल्या सामन्यात चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजरने पाचोरा योद्धाजवर दणदणीत विजय मिळवला.

​अमळनेरचा ६३ धावांनी मोठा विजय
​अमळनेर सुहांस जायंट्स आणि चाळीसगाव चॅलेंजर्स यांच्यातील सामन्यात अमळनेरने प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकांत ८ बाद १४७ धावा केल्या. यात मानव टिबरेवाल (३९), अजय पाटील (३४) आणि सतीश चतुर्वेदी (२०) यांनी मोलाचे योगदान दिले. चाळीसगावच्या ओम मुंडेने १३ धावांत ३ बळी टिपले. मात्र, १४८ धावांचा पाठलाग करताना चाळीसगावचा डाव अवघ्या ८४ धावांत आटोपला. अमळनेरच्या मोहम्मद सैफने भेदक मारा करत ३ फलंदाज बाद केले, त्याला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले.

​रावेर रॉयल्सचा थरारक विजय
​दुसऱ्या एका सामन्यात रावेर रॉयल्सने पाचोरा एसकेटी योद्धाजवर ७ धावांनी निसटता विजय मिळवला. रावेरने प्रथम फलंदाजी करत १३० धावा केल्या. यात यश नहार (३१) आणि मोहम्मद नमीन (२७) यांची फटकेबाजी महत्त्वपूर्ण ठरली. आव्हानाचा पाठलाग करताना पाचोरा संघाचा डाव १२३ धावांवर मर्यादित राहिला. रावेरच्या यश नहारने ३१ धावा आणि ३ बळी घेत अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ‘सामनावीर’ किताब पटकावला.

​चाळीसगाव चॅलेंजर्सचे वर्चस्व
​२१ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजरने पाचोरा एसकेटी योद्धाजवर ६ गडी राखून विजय मिळवला. पाचोरा संघाने दिलेले १०६ धावांचे लक्ष्य चाळीसगावने प्रशांत डोळे (३७) आणि साहिल गायकर (२९) यांच्या खेळीमुळे १३.५ षटकांतच पूर्ण केले. अभी पाटीलने ३ बळी घेत पाचोराच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले होते.

​क्वालीफायरचा फैसला उद्या!
साखळी फेरीचे आता केवळ दोन सामने शिल्लक असून २३ एप्रिल रोजी ‘क्वालीफायर’ संघांचे चित्र स्पष्ट होईल. सध्या गुणतालिकेत जामनेर सातपुडा हिरोज आणि जळगाव कोगटा किंग प्रत्येकी ६ गुणांसह अव्वल स्थानी आहेत.


 

Tags: #jalgaon_city#JCL T20#sports
Next Post
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय गायन स्पर्धेत बाजी

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय गायन स्पर्धेत बाजी

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add