• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! दोन चोरीचे गुन्हे अवघ्या तीन तासांत उघड; मुद्देमालासह आरोपी जेरबंद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 20, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! दोन चोरीचे गुन्हे अवघ्या तीन तासांत उघड; मुद्देमालासह आरोपी जेरबंद

​पाचोरा, (प्रतिनिधी) : शहरातील चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात पाचोरा पोलिसांना मोठे यश आले आहे. अत्यंत कौशल्याने तपास चक्रे फिरवत पोलिसांनी केवळ तीन तासांच्या आत चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले असून, ९४ हजार ५०० रुपये किमतीचे तीन ए.सी. आणि ३० हजार रुपयांची सोन्याची पोत असा एकूण सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, जारगाव (ता. पाचोरा) येथील रहिवासी आणि इलेक्ट्रिकल व्यावसायिक नय्युम जहांगीर देशमुख यांच्या अक्सानगर येथील गोदामातून अज्ञात चोरट्यांनी १ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान तीन गोदरेज कंपनीचे ए.सी. लंपास केले होते. याप्रकरणी १६ एप्रिल रोजी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी तपासासाठी विशेष पथक नियुक्त केले. ​गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी रिहान हमीश शहा (वय २२, रा. हनुमान नगर, पाचोरा) या संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गोदामातून ए.सी. चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ९४,५०० रुपये किमतीचे तिन्ही ए.सी. जप्त केले आहेत.

​याच तपासादरम्यान, १५ एप्रिल २०२६ रोजी दाखल झालेला सोन्याची पोत चोरीचा आणखी एक गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला. ३० हजार रुपये किमतीची ही सोन्याची पोतदेखील पोलिसांनी हस्तगत केली आहे. अवघ्या तीन तासांत दोन मोठे गुन्हे उघड करून पूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याने फिर्यादी व नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
​
​ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली स.फौ. विलास पाटील, पोहेकाँ वसीम शेख, श्रीकांत गायकवाड, पोकाँ योगेश पाटील, संदीप राजपूत आणि गणेश कुंवर यांच्या पथकाने केली आहे. गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पाचोरा पोलिसांनी राबवलेल्या या मोहिमेचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
नशिराबादमध्ये सराईत गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह अटक

नशिराबादमध्ये सराईत गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह अटक

ताज्या बातम्या

नशिराबादमध्ये सराईत गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह अटक
गुन्हे

नशिराबादमध्ये सराईत गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह अटक

April 20, 2026
पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! दोन चोरीचे गुन्हे अवघ्या तीन तासांत उघड; मुद्देमालासह आरोपी जेरबंद
गुन्हे

पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! दोन चोरीचे गुन्हे अवघ्या तीन तासांत उघड; मुद्देमालासह आरोपी जेरबंद

April 20, 2026
‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’
क्रिडा

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 20, 2026
पशुपालकांसाठी सुवर्णसंधी; पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डद्वारे ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य
कृषी

पशुपालकांसाठी सुवर्णसंधी; पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डद्वारे ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

April 20, 2026
जळगाव क्रिकेट लीगला उत्साहात सुरुवात; जामनेर सातपुडा हिरोजचे विजयी पदार्पण
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीगला उत्साहात सुरुवात; जामनेर सातपुडा हिरोजचे विजयी पदार्पण

April 19, 2026
वैद्यकीय महाविद्यालयात स्वरांचा अनोखा मिलाफ; डॉ. उल्हास पाटील व डॉ. वर्षा पाटील यांनी गायली सदाबहार गीते!
जळगाव जिल्हा

वैद्यकीय महाविद्यालयात स्वरांचा अनोखा मिलाफ; डॉ. उल्हास पाटील व डॉ. वर्षा पाटील यांनी गायली सदाबहार गीते!

April 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group