• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नशिराबादमध्ये सराईत गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह अटक

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 20, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
नशिराबादमध्ये सराईत गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह अटक

जळगाव, (प्रतिनिधी) : नशिराबाद बस स्थानक परिसरात दहशत माजवणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला जळगाव जिल्हा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून एक लोखंडी बनावटीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

​दि.१९ एप्रिल २०२६ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, नशिराबाद गावातील बस स्थानक परिसरात एक इसम बेकायदेशीर हत्यारासह फिरत असून लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहे. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाईचे नियोजन केले.

​​मिळालेल्या आदेशानुसार, पोलीस पथकाने सायंकाळी बस स्थानक परिसरात अचानक छापा टाकला. यावेळी संशयित आरोपी कमलाकर प्रभाकर महाजन (वय ३६, रा. वरची अळी, नशिराबाद) याला जागीच ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे लोखंडी चंदेरी रंगाचा व काळ्या रंगाची प्लास्टिक मूठ असलेला एक गावठी कट्टा मिळून आला. पोलिसांनी तो कट्टा तात्काळ जप्त केला आहे.

​​याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे करत आहेत. ​धडक कारवाई पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक हरेश पाटील, चंद्रकांत पाटील, गुणवंत देशमुख, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर बिडे, प्रवीण लोहार आणि समीर सैय्यद या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
​

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
जळगावच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे यांची नियुक्ती; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली

जळगावच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे यांची नियुक्ती; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group