• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पशुपालकांसाठी सुवर्णसंधी; पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डद्वारे ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 20, 2026
in कृषी, जळगाव जिल्हा
0
पशुपालकांसाठी सुवर्णसंधी; पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डद्वारे ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

जळगाव, (प्रतिनिधी) : राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड (KCC) मोहीम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पशुपालन, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन व वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पशुधनाच्या देखभालीसाठी तसेच दैनंदिन खर्चासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून दिले जात आहे.

या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही, त्यांना १.६० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण उपलब्ध करून दिले जाईल. दूध संस्थेची हमी असल्यास कर्जमर्यादा ३ लाख रुपयांपर्यंत वाढवता येते. तसेच, विद्यमान किसान क्रेडिट कार्डधारकांनाही त्यांच्या पतमर्यादेत वाढ करून घेण्याची संधी उपलब्ध आहे.

कर्जावरील मूळ व्याजदर ९ टक्के असला तरी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून ३ टक्के व राज्य शासनाकडून ४ टक्के अशी एकूण ७ टक्क्यांपर्यंत व्याज सवलत मिळते. याशिवाय बँकांकडून २ टक्क्यांची अतिरिक्त सवलत मिळत असल्याने, वेळेवर कर्जफेड करणाऱ्या पशुपालकांना प्रत्यक्षात शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळू शकतो.

सन २०२६-२७ पासून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गतही या क्रेडिट कार्डद्वारे खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार असून, राज्यातील सुमारे १० लाख पात्र पशुपालकांना या योजनेच्या कक्षेत आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या योजनेसाठी अर्जदाराने कोणत्याही इतर शासकीय अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा तसेच पशुधनाची एनडीएलएम (भारत पशुधन पोर्टल) वर नोंदणी असणे आवश्यक आहे. याशिवाय निश्चित मर्यादेपर्यंत पशुधन असणे व कर्जाची परतफेड एक वर्षाच्या आत करणे बंधनकारक आहे.

दूध सोसायटी, दूध उत्पादक कंपनी किंवा सहकारी संस्थांचे सदस्य असलेले व अद्याप या योजनेचा लाभ न घेतलेले पशुपालक या मोहिमेसाठी पात्र आहेत. अधिक माहितीसाठी संबंधितांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा किंवा १९६२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पशुधनाच्या संगोपनासाठी आर्थिक अडचण भासू नये, तसेच ग्रामीण भागात पशुधन व्यवसायाला चालना मिळावी, यासाठी जास्तीत जास्त पात्र पशुपालकांनी आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी किंवा दूध संस्थेशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा.”असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.


 

Next Post
‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add