• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव क्रिकेट लीगला उत्साहात सुरुवात; जामनेर सातपुडा हिरोजचे विजयी पदार्पण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 19, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
जळगाव क्रिकेट लीगला उत्साहात सुरुवात; जामनेर सातपुडा हिरोजचे विजयी पदार्पण

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव क्रिकेट लिगच्या कार्यक्रमाचे शानदार उद्घाटन शनिवारी संध्याकाळी झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आ. सुरेश भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. किशोर पाटील, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, संचालक अतुल जैन, धुळ्याचे महापौर मायादेवी परदेशी, नयनतारा बाफना, दीपक चौधरी उपस्थित होते.

यावेळी जळगाव कोगटा किंग्ज संघाचे मालक अतुल कोगटा, जामनेर सातपुडा हिरोजचे किरण बच्छाव, चाळिसगा चॅलेंन्सर्ज संजय भावसार, रावेर रॉयल्स महाविर जैन, विमल जैन, अमळनेर सुहांस जायंट्सचे संदीप काबरा, पाचोरा एसकेटी योद्धाजचे हेमंत कोठारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात अतुल जैन यांनी सन २०१९ मध्ये झालेल्या जेसीएलमधून राष्ट्रीय पातळीवर तसेच राज्य पातळीवर सात ते आठ खेळाडूंनी आपले कौशल्य दाखविले आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवरील पायाभूत सुविधा जैन ड्रीम स्पेसेस च्या भव्य क्रीडांगणावर केल्या गेल्याची माहिती दिली.

सुरेशदादांनी जागवल्या आठवणी..
माजी मंत्री सुरेशदादा जैन हे उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू होते. मैदानावर त्यांनी जुन्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले, मी इंदूर येथे असताना चांगला क्रिकेट खेळत होतो. माझी रणजी संघातही निवड त्यावेळी झाली होती. विद्यापीठ पातळीवर मी अनेक सामने खेळलो होतो. आता जळगावात अशोकभाऊ व अतुलभाऊ यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी चांगली संधी निर्माण केली आहे. या स्पर्धेतून राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू तयार होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

जळगावचे वानखेडे स्टेडियम म्हणजे जैन ड्रीम स्पेसेसचे क्रीडांगण – गिरीश महाजन
मैदान व आयोजनाबाबत अशोक जैन आणि अतुल जैन यांचे मंत्री गिरीश महाजन यांनी कौतुक केले. ते पुढे म्हणाले, मी परवाच वानखेडे स्टेडीयमवर होतो. ते मैदान पाहिले. त्यापेक्षा जळगावातील मैदान अधिक चांगले झाले आहे. यामुळे आता जळगावातून अनेक चांगले खेळाडू निर्माण होतील. सुरेशदादा यांनी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरील खेळाडू निर्माण होतील. पुढे बोलताना ते म्हणाले की, शालेय व महाविद्यालयीन काळात ते कुस्ती, कबड्डी आदी खेळांत सक्रिय होते; मात्र एका खेळावर लक्ष केंद्रित केले नाही. त्याचवेळी सुरेशदादा जैन यांनी गिरीश राजकारणाच्या खेळात रंगल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर महाजन पुढे म्हणाले, राजकारणाच्या खेळात मी चांगलाच रंगलो. त्यामुळेच सात वेळा सरपंच, सात वेळा आमदार आणि तीन वेळा मंत्रीपद मिळाल्याचे सांगतले.

अंतीम सामनातील विजेत्याला दिली जाणाऱ्या ट्रॉफीचे अनावरण..
मान्यवरांच्या उपस्थितीत जळगाव क्रिकेट लीगच्या ट्रॉफीचे दिमाखानात उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शानदार सांस्कृतिक कार्यक्रम झाले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

पहिल्याच रोमांचकारी सामन्यात जामनेर सातुपडा हिरोजचा ‘अक्षय’ विजय..
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६,  JCL T-20 क्रिकेटचा रोमहर्षक संग्रामाला सुरवात झाली. जामनेर सातुपडा हिरोज् व पाचोरा एसकेटी योद्धाज मध्ये झालेल्या पहिल्याच रोमांचकारी सामन्यात जामनेर सातुपडा हिरोज यांनी ‘अक्षय’ विजय नोंदविला. मेहरूण तलाव परिसरातील कांताई नगर येथील जैन ड्रीम स्पेसेस येथील भव्य क्रीडांगणावर सुरू असलेल्या जळगाव क्रिकेट लीगच्या पहिल्या सामन्याचे नाणेफेक जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या हस्ते झाले. जामनेर सातपुडा हिरोज् संघाचे कर्णधार शतायू कुलकर्णी यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. विजयी जामनेर सातपुडा हिरोज् संघाला १५००० रोख पारितोषिक तर उपविजयी पाचोरा एसकेटी योद्धाज ला ८००० रुपये रोख पारितोषिकाने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे गौरविण्यात आले. सूत्रसंचालन विजयकुमार अय्यर यांनी केले.


 

Tags: #cricket#jalgaon_city#jclt२०#sports
Next Post
पशुपालकांसाठी सुवर्णसंधी; पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डद्वारे ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

पशुपालकांसाठी सुवर्णसंधी; पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डद्वारे ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add