• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 18, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक

​जळगाव, (प्रतिनिधी) : पाचोरा शहरात ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरसाठी जादा रकमेची मागणी करून ५०० रुपयांची लाच स्वीकारताना एका अधिकृत स्टॅम्प वेंडरसह त्याच्या भावाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. ही कारवाई १७ मार्च २०२६ रोजी करण्यात आली असून, या घटनेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला ५०० रुपये दराचे १० स्टॅम्प पेपर हवे होते. शासकीय नियमानुसार त्याची एकूण किंमत ५,००० रुपये होणे अपेक्षित होते. मात्र, पाचोरा येथील जामनेर-पाचोरा रोडवरील प्रशांत झेरॉक्स सेंटरचे अधिकृत स्टॅम्प वेंडर योगेश ईश्वरलाल संघवी (वय ४९) यांनी तक्रारदाराकडे ५,५०० रुपयांची मागणी केली. म्हणजेच प्रत्येक स्टॅम्पमागे ५० रुपये याप्रमाणे एकूण ५०० रुपये अधिकची लाच मागितली. ​तक्रारदाराने जादा पैसे देण्यास नकार दिला असता, संघवी यांनी पैसे दिल्याशिवाय स्टॅम्प मिळणार नाही असे स्पष्ट सांगितले. अखेर नाईलाजास्तव तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.

तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, एसीबीच्या पथकाने १७ मार्च रोजी सापळा रचला. यावेळी योगेश संघवी याने लाचेच्या ५०० रुपयांच्या रकमेची मागणी केली आणि ही रक्कम त्याचे भाऊ प्रशांत ईश्वरलाल संघवी (वय ५३) यांनी स्वीकारली. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले.

याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, बाळू मराठे, भूषण पाटील यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

​महत्वाचे आवाहन:
कोणत्याही शासकीय कामासाठी कोणाही लोकसेवकाने किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


 

Tags: #curption#pachoraCrimeJalgaonPolice
Next Post
‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम

'चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया'! ; मुनोत परिवारातर्फे मोफत 'जलकुंड' आणि 'परळ' वाटप उपक्रम

ताज्या बातम्या

जळगाव सी.ए. शाखेत ३ दिवसीय ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ कोर्स संपन्न; सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

जळगाव सी.ए. शाखेत ३ दिवसीय ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ कोर्स संपन्न; सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

May 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलची निकालात बाजी; सलग १९ व्या वर्षी १०० टक्के यशाची परंपरा कायम
जळगाव जिल्हा

अनुभूती निवासी स्कूलची निकालात बाजी; सलग १९ व्या वर्षी १०० टक्के यशाची परंपरा कायम

May 3, 2026
पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेचा ‘जिल्हा युवा पुरस्कारा’ने गौरव; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
जळगाव जिल्हा

पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेचा ‘जिल्हा युवा पुरस्कारा’ने गौरव; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

May 3, 2026
जळगाव एमआयडीसीत चटई कंपनीला भीषण आग; आगीत मोठे नुकसान
जळगाव जिल्हा

जळगाव एमआयडीसीत चटई कंपनीला भीषण आग; आगीत मोठे नुकसान

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये बुद्ध मूर्तीची उत्साहात प्रतिष्ठापना
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये बुद्ध मूर्तीची उत्साहात प्रतिष्ठापना

May 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group