• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत दुचाकी चोरटा जेरबंद; १० मोटारसायकली जप्त

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 18, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत दुचाकी चोरटा जेरबंद; १० मोटारसायकली जप्त

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी केली आहे. या कारवाईत एका सराईत चोरट्याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ३ लाख १० हजार रुपये किमतीच्या एकूण १० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

​दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी जळगाव शहरातील भानू हॉटेल परिसरातून कल्पेश ज्ञानेश्वर चौधरी यांची ‘हिरो स्प्लेंडर’ (एमएच १९ बीवाय ७४१३) चोरीला गेली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता.
​
​स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, नशिराबाद येथील ताज नगरमधील रहिवासी समीर शेख शफीक शेख (वय २० वर्षे) याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने जळगाव शहर, एमआयडीसी, जिल्हापेठ आणि चक्क मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथूनही मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.

​पोलिसांनी आरोपीकडून विविध कंपन्यांच्या एकूण १० मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या कारवाईनंतर आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी शनिपेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. या आरोपीकडून अजूनही अनेक चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

​ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सपोनि शरद बागल आणि त्यांच्या पथकातील अंमलदार अतुल वंजारी, विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, किशोर पाटील, रवींद्र कापडणे, राहुल रगडे, छगन तायडे, अजय पाटील आणि प्रवीण हिवराळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Tags: CrimeJalgaonlcbPolice
Next Post
जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक

जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक

ताज्या बातम्या

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक रुग्णालयात ‘स्नेहन व स्वेदन’ उपचार सुविधा सुरू!
आरोग्य

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक रुग्णालयात ‘स्नेहन व स्वेदन’ उपचार सुविधा सुरू!

June 18, 2026
गोदावरी इंजिनिअरिंगच्या मृणाली आणि गणेशराजची ‘कॉग्निझंट’ व ‘अ‍ॅक्सेंचर’ कंपनीत निवड!
शैक्षणिक

गोदावरी इंजिनिअरिंगच्या मृणाली आणि गणेशराजची ‘कॉग्निझंट’ व ‘अ‍ॅक्सेंचर’ कंपनीत निवड!

June 18, 2026
जळगावात उद्यापासून भव्य ‘श्रीमद् भागवत कथा’ व ‘अखंड हरिनाम सप्ताह’ सोहळा
जळगाव जिल्हा

जळगावात उद्यापासून भव्य ‘श्रीमद् भागवत कथा’ व ‘अखंड हरिनाम सप्ताह’ सोहळा

June 18, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद
राजकीय

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद

June 18, 2026
प्रभाग क्र. ९ मधील सांडपाण्याच्या समस्येची दखल; उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून प्रत्यक्ष पाहणी
जळगाव जिल्हा

प्रभाग क्र. ९ मधील सांडपाण्याच्या समस्येची दखल; उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून प्रत्यक्ष पाहणी

June 18, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
जळगाव जिल्हा

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group