• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भडगाव तालुक्यात सीईओ करिश्मा नायर यांची क्षेत्रीय भेट

जलतारा उपक्रमाचे उद्घाटन; सोजत गोट फार्मची पाहणी, चारा उपलब्धतेचा घेतला आढावा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 4, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक
0
भडगाव तालुक्यात सीईओ करिश्मा नायर यांची क्षेत्रीय भेट

जळगाव, प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी ३ नोव्हेंबर रोजी भडगाव तालुक्याला क्षेत्रीय भेट देऊन जलसंधारण आणि पशुसंवर्धनविषयक उपक्रमांची पाहणी केली. यावेळी जुवार्डी येथे जलतारा उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, तर गुढे येथील सोजत गोट फार्मला भेट देऊन प्रकल्पाची माहिती जाणून घेण्यात आली.

जुवार्डी येथे जलतारा उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी योजनेचे संस्थापक श्री. वायाळ उपस्थित होते. जलसंधारण, भूजल पातळीत वाढ आणि पावसाच्या पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी जलतारा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. ग्रामस्थांनी लोकसहभागातून अशा उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहनही करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन जुवार्डी गावचे पी. ए. पाटील आणि रोजगार सेवक भूषण पाटील यांनी केले होते. यावेळी भडगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी के. बी. अंजने, पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

यानंतर करिश्मा नायर यांनी राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत गुढे येथे उभारण्यात आलेल्या ५००+२५ सोजत गोट फार्मला भेट दिली. प्रकल्पाची सविस्तर माहिती घेत त्यांनी प्रक्षेत्रावरील चारा पिकांची लागवड आणि उत्पादनाची पाहणी केली. चारा पिकांच्या लागवडीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नायर यांनी तालुक्यातील चारा उपलब्धतेचाही आढावा घेतला. सध्या तालुक्यात पुरेसा चारा उपलब्ध असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठीच्या उपाययोजना, चारा साक्षरता अभियान आणि रब्बी हंगामातील वैरण बियाणे वाटप याबाबत चर्चा करण्यात आली.

VB-G-RAMG योजनेंतर्गत चारा लागवडीसाठी मका, ज्वारी आणि बाजरी या वैरण बियाण्यांचा समावेश करण्याबाबतही विचारविनिमय झाला.

या क्षेत्रीय भेटीदरम्यान सहाय्यक आयुक्त डॉ. संदीप निकम, गुढे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा कापसे आणि अमडदे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल गायकवाड उपस्थित होते.

जलसंधारण, लोकसहभागातून ग्रामविकास आणि पशुसंवर्धनाला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्नशील असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.


 

ताज्या बातम्या

भडगाव तालुक्यात सीईओ करिश्मा नायर यांची क्षेत्रीय भेट
खान्देश

भडगाव तालुक्यात सीईओ करिश्मा नायर यांची क्षेत्रीय भेट

November 4, 2026
‘मृत्यूशी झुंज, डॉक्टरांची जिद्द अन् आयुष्याची नवी पहाट!
खान्देश

‘मृत्यूशी झुंज, डॉक्टरांची जिद्द अन् आयुष्याची नवी पहाट!

November 4, 2026
अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई
राजकीय

अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई

November 3, 2026
पारोळ्यात महिलेचे दागिने लांबवणारा सराईत चोरटा बीडमधून गजाआड!
गुन्हे

पारोळ्यात महिलेचे दागिने लांबवणारा सराईत चोरटा बीडमधून गजाआड!

November 3, 2026
जिल्हा बँक निवडणुकीत छाननीचा धक्का ; संजय पवार, अनिल पाटील, सुमित पाटील यांचे अर्ज बाद
खान्देश

जिल्हा बँक निवडणुकीत छाननीचा धक्का ; संजय पवार, अनिल पाटील, सुमित पाटील यांचे अर्ज बाद

November 3, 2026
वॉर्ड १५ मधील स्वच्छतेच्या प्रश्नांवर महापौरांचे तातडीने कारवाईचे आदेश
जळगाव जिल्हा

वॉर्ड १५ मधील स्वच्छतेच्या प्रश्नांवर महापौरांचे तातडीने कारवाईचे आदेश

November 3, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add