• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 15, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा, राजकीय
0
पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात शनिवारी दुपारी राजकीय वर्चस्व आणि गटार कामाच्या ठेक्यावरून दोन गटांत मोठा संघर्ष पाहायला मिळाला. माजी नगरसेवक कैलास सोनवणे आणि शिंदे गटाचे समर्थक राहुल ऊर्फ मोगली ठाकरे यांचे कुटुंबीय एकमेकांना भिडल्याने रिधूरवाडा परिसरात तणाव निर्माण झाला होता. विशेष म्हणजे, या वादाचा दुसरा अंक थेट पोलीस ठाण्यात पार पडला, जिथे दोन्ही गट आपापसात भिडल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला.

​राजकीय वैमनस्याची पार्श्वभूमी..
​या वादाची मुळे महापालिका निवडणुकीपर्यंत जातात. प्रभाग क्रमांक ३ मधून कैलास सोनवणे यांची मुलगी आणि राहुल ठाकरे यांची पत्नी समोरासमोर होत्या. या अटीतटीच्या लढतीत ठाकरे यांच्या पत्नीचा निसटता पराभव झाला होता. तेव्हापासून या दोन्ही गटात धुसफूस सुरू होती. शनिवारी प्रभागातील गटारीच्या कामाचा मक्ता (ठेका) कोणाला मिळावा, यावरून या वादाचा भडका उडाला.

​तलवारी आणि लाठ्या-काठ्यांचा वापर..
​दुपारी ४ वाजेच्या सुमारास ठाकरे गटातील काही लोक सोनवणे यांच्या घराजवळ पोहोचले. शाब्दिक वादाचे रूपांतर लगेचच हिंसक हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही गटांकडून तलवार आणि लाकडी दांडक्यांचा वापर करण्यात आला. यात दोन्ही बाजूंचे पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.

​जखमींची नावे:
​सोनवणे गट: कैलास सोनवणे (५५), सागर प्रल्हाद सोनवणे (३०), विशाल प्रल्हाद सोनवणे (३०).
​ठाकरे गट: हितेश डिगंबर ठाकरे (२८), शैलेश ठाकरे (५५).

​पोलीस ठाण्यातच थेट हल्ला..
​घटनेनंतर दोन्ही गट तक्रार देण्यासाठी शनिपेठ पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलीस अधिकारी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसून जबाब नोंदवत असतानाच, राहुल ठाकरे यांनी ५-६ जणांसह पोलीस ठाण्यात शिरून कैलास सोनवणे यांच्यावर हल्ला चढवला. पोलीस ठाण्याच्या आवारातच पुन्हा मारहाण सुरू झाल्याने तणाव कमालीचा वाढला होता. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून जमावाला पांगवले.

​१० ते १२ जण ताब्यात..
​घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने कठोर कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी दोन्ही गटांतील १० ते १२ जणांना ताब्यात घेतले असून, गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सध्या घटनेच्या ठिकाणी आणि पोलीस ठाणे परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

​विडिओ


 

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या

नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add