• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘कबचौउमवि’तर्फे दिलीप तिवारी यांना पी.एच.डी. प्रदान

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 31, 2025
in कृषी, खान्देश, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
‘कबचौउमवि’तर्फे दिलीप तिवारी यांना पी.एच.डी. प्रदान

‘कृषी नवतंत्र आणि बहुमाध्यमे वापरामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांचे जीवनमान बदलले’ हा संशोधन प्रबंधाचा निष्कर्ष

जळगाव, (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातर्फे जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप मनोरमा केशवलाल तिवारी यांना पी.एच.डी. पदवी (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी अर्थात विद्यावाचस्पती) प्रदान करण्याचे पत्र (नोटीफिकेशन) आज प्रदान करण्यात आले. विद्यापिठाचे कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते श्री. तिवारी यांना याबाबत अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रकुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, मार्गदर्शक प्रा. डाॅ. सुधीर भटकर, संशोधन विभागाचे सहायक कुलसचिव प्रविण चंदनकर, डाॅ. सोमनाथ वडनेरे, सुभाष तळेले उपस्थित होते.

कबचौउमविती आंतर विद्याशाखेत जनसंवाद व पत्रकारिता विभागामार्फत श्री. तिवारी यांनी सादर केलेल्या ८५० पानांच्या प्रदीर्घ संशोधन प्रबंधास विद्यापिठाने स्वीकृती दिली आहे. श्री. तिवारी यांचा संशोधन प्रबंधाचा विषय जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमानात नवतंत्र आणि बहुमाध्यम वापरामुळे कसे बदलले ? हे ठळक निष्कर्षांमधून समोर आणतो. संशोधन प्रबंधाचा विषय ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ : जळगाव जिल्हा)’ हा आहे.

जळगाव जिल्ह्यातील केळी लागवड, केळी लागवडीत नवतंत्र वापर, केळी उत्पादकांकडून माहितीसाठी बहुमाध्यम वापर, केळी उत्पादन आणि उत्पन्नात वाढ, हातात जादा पैसा आल्यानंतर शेतकऱ्यांच्या जीवनमान – राहणीमानात बदल अशा मुख्य विषयांचा सविस्तर अभ्यास संशोधन कार्यात केला आहे. केळी लागवड करणारा शेतकरी कोणते माध्यम वापरतो, त्यातून कोणती माहिती घेतो, माहितीचा उपयोग केळी लागवडीत कसा होतो, उत्पादन कसे वाढते, उत्पन्न वाढल्यामुळे त्याचे जीवनमान कसे उंचावते या विषयी संशोधन प्रबंधात प्रश्नावली – मुलाखती आणि विश्लेषणाचे सविस्तर प्रकरण आहे. केळी उत्पादन वाढीसाठी नवतंत्र शोध, त्याचा शेत शिवारात प्रत्यक्ष वापर, प्रचार-प्रसार या कार्यात जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमीटेडचे योगदान याचाही सविस्तर आढावा संशोधन प्रबंधात घेतला आहे. सरकारी कृषी गणना किंवा सामान्य जनगणना या पुढे जावून श्री. तिवारी यांनी केळी उत्पादकांच्या कौटुंबिक – सामाजिक आयुष्याचा सांख्यिकी अभ्यास संशोधन प्रबंधात सादर केला आहे. सन १९८९ नंतर जिल्हयातील केळी उत्पादकांची आर्थिक – सामाजिक स्थिती दाखवणारे हे एकमेव व्यापक संशोधन आहे.


 

Next Post
अतिवृष्टी अन् आव्हानांवर मात करत जैन इरिगेशन कंपनीच्या महसुलात लक्षणीय वाढ

अतिवृष्टी अन् आव्हानांवर मात करत जैन इरिगेशन कंपनीच्या महसुलात लक्षणीय वाढ

ताज्या बातम्या

पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी
जळगाव जिल्हा

पाचोरा बायपासवर भीषण अपघात; भरधाव ट्रकने इलेक्ट्रिक पोल उडवला, चालक जखमी

March 19, 2026
पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन
जळगाव जिल्हा

पाचोरा काँग्रेस आक्रमक! गॅस दरवाढ आणि काळाबाजाराविरोधात तहसीलदारांना निवेदन

March 19, 2026
भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

March 19, 2026
अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद
गुन्हे

अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद

March 18, 2026
‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम
जळगाव जिल्हा

‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम

March 18, 2026
जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक
गुन्हे

जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक

March 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group