• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बहुप्रतिक्षित ‘रिंग रोड’ कामाचे थाटात भूमिपूजन; ​आमदार राजुमामा भोळेंच्या प्रयत्नांना यश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 27, 2026
in जळगाव जिल्हा
0
बहुप्रतिक्षित ‘रिंग रोड’ कामाचे थाटात भूमिपूजन; ​आमदार राजुमामा भोळेंच्या प्रयत्नांना यश

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान व सुरक्षित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन आज बहिणाबाई उद्यानासमोरील परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा व अथक प्रयत्नांमुळे या महत्त्वाकांक्षी विकासकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, सभागृह नेते नितीन लढ्ढा, गटनेते प्रकाश बालाणी, नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे,  शुचिता हाडा, अमित काळे, अंकिता पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी सांगितले की, जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार व रुंद रस्ते निर्माण करणे ही काळाची गरज असून रिंग रोडच्या विकासामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होण्यास तसेच शहराच्या विकासाला गती मिळण्यास मोठी मदत होणार आहे. शहरातील विविध विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून आणखी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

उपस्थित मान्यवरांनीही या विकासकामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगत, काम उच्च दर्जाचे व निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली. भूमिपूजनानंतर उपस्थित मान्यवरांनी विकासकामाच्या यशस्वी व वेळेत पूर्णत्वासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.


 

Tags: #mlasureshbholeJalgaon
Next Post
जुन्या भांडणातून तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जुन्या भांडणातून तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add