• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तापी सहकारी सूतगिरणीच्या जिनिंग व प्रेसिंग प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न

तापी सूतगिरणीचा जिनिंग व प्रेसिंग प्रकल्प शेतकऱ्यांना ठरणार लाभदायक गृहमंत्री दिलीप वळसे.. - पाटील

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 21, 2021
in जळगाव जिल्हा
0
तापी सहकारी सूतगिरणीच्या जिनिंग व प्रेसिंग प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न

जळगाव, दि. 20 (जिमाका) – जळगाव जिल्ह्यातील तापी आणि गिरणा नदीच्या खोऱ्याचा भाग हा कापूस व केळी पिकासाठी ओळखला जातो. या भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तापी सहकारी सूतगिरणीचा जिनिंग व प्रेसिंग प्रकल्प लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी केले.

तापी सहकारी सूतगिरणीच्या धरणगाव रस्त्यावरील कार्यस्थळ परिसरात रेल मारुती जिनिंग व प्रेसिंगचे भूमिपूजन गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांच्या हस्ते आज दुपारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. विधान सभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार अनिल पाटील, पंचायत समितीच्या सभापती कल्पना पाटील, उपसभापती सूर्यकांत खैरनार, सूतगिरणी चेअरमन तथा माजी आमदार कैलास पाटील, व्हा. चेअरमन प्रभाकर पाटील, माजीमंत्री एकनाथराव खडसे, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

गृहमंत्री श्री. वळसे- पाटील म्हणाले, शेतकऱ्यांची संस्था सचोटी व प्रामाणिकपणे चालली आहे. शेतकरी हिताची कामे होत असल्याने सहकारी संस्था प्रगती साधत आहेत. तापी सूतगिरणीचे चेअरमन माजी आ. कैलास पाटील यांचे नेतृत्वाखाली हा प्रकल्प चांगली प्रगती साधत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल, असेही त्यांनी नमूद केले.

चेअरमन श्री. पाटील म्हणाले की, चोपडा तालुक्यात सूतगिरणी सुरू झाल्यानंतर तरुणांना शाश्वत रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. सुमारे शंभर कोटींचा हा प्रकल्प सभासद शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभदायी ठरावा म्हणून जिनिंग- प्रेसिंग सुरू केली जाणार आहे. त्यासाठी चार कोटी रुपये खर्चून यंत्रसामग्री उभारली जाणार आहे. एकूण खर्च किमान 15 कोटी रुपये येणार आहे. राधेश्याम पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संजय बोरसे यांनी आभार मानले.

यावेळी ॲड. संदीप पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक घनःश्याम अग्रवाल, माजी आमदार प्रा. दिलीप सोनवणे, मनीष जैन, ॲड. घनःश्याम पाटील, नीता पाटील, चोपडा साखर कारखान्याचे चेअरमन अतुल ठाकरे, व्हा. चेअरमन शशिकांत देवरे, शेतकी संघाचे अध्यक्ष दुर्गादास पाटील, चोपडा नगरपरिषदेतील गटनेते जीवन चौधरी, उद्योजक आशिष गुजराथी, विजयाताई पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, सूतगिरणीचे संचालक, शेतकरी, सभासद उपस्थित होते.


 

Next Post
भाजपा बाराबलुतेदार आघाडीतर्फे गाडगेबाबा यांची 65 वी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन

भाजपा बाराबलुतेदार आघाडीतर्फे गाडगेबाबा यांची 65 वी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन

ताज्या बातम्या

वारकर्‍यांसाठी डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी’तर्फे मोफत सेवा शिबिर
आरोग्य

वारकर्‍यांसाठी डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी’तर्फे मोफत सेवा शिबिर

July 11, 2026
‘मॉर्फोमाइंड २०२६’ पॅथॉलॉजी क्विझमध्ये ‘हॉजकिन्स हायटेक्स’ संघ विजेता
जळगाव जिल्हा

‘मॉर्फोमाइंड २०२६’ पॅथॉलॉजी क्विझमध्ये ‘हॉजकिन्स हायटेक्स’ संघ विजेता

July 11, 2026
जळगावात ५६.२१ ग्रॅम मेफेड्रोन अमली पदार्थासह दोन जण गजाआड!
गुन्हे

जळगावात ५६.२१ ग्रॅम मेफेड्रोन अमली पदार्थासह दोन जण गजाआड!

July 11, 2026
नेत्रदीपक यश! खान्देश, विदर्भ आणि संभाजीनगरात ६१,२२९ मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा ऐतिहासिक टप्पा
जळगाव जिल्हा

नेत्रदीपक यश! खान्देश, विदर्भ आणि संभाजीनगरात ६१,२२९ मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा ऐतिहासिक टप्पा

July 11, 2026
चाळीसगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई; ६.५७ लाखांच्या गुटखा तस्करीसह ५ आरोपी जेरबंद
गुन्हे

चाळीसगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई; ६.५७ लाखांच्या गुटखा तस्करीसह ५ आरोपी जेरबंद

July 11, 2026
गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी किरीट भाईजी जळगावात येणार
धार्मिक

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी किरीट भाईजी जळगावात येणार

July 10, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group