जळगाव,दि. 21 – शहरातील आर.आर. विद्यालय समोर असलेल्या राष्ट्रसंत गाडगे बाबा उद्यानात गाडगेबाबा यांची 65 वी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपचे जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजुमामा), महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, बाराबलुतेदार आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक बाविस्कर, बाराबलुतेदार आघाडी सचिव प्रशांत मांडोळे, सुरेश ठाकरे, अरुण राऊत, नरेंद्र जाधव, प्रभाकर खर्चे, शंकरराव निंबाळकर, भास्कर वाघ, शाम वाघ, दिलीप शेवाळे, राजेंद्र सोनवणे, राजेश जाधव, रघुनाथ भदाणे, सर्जेराव बेडिस्कर, भागवत शेवाळे, राहुल वाघ, धनंजय सोनवणे, गणेश सपके, मनोज निंबाळकर, राकेश वाघ, हर्षल तिवणे, यतीश शेवाळे याच्यासह परीट धोबी समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.