• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चांदोरकर प्रतिष्ठान कडून आनंदघरला कॉम्प्युटर भेट

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 17, 2025
in जळगाव जिल्हा
0
चांदोरकर प्रतिष्ठान कडून आनंदघरला कॉम्प्युटर भेट

जळगाव, (प्रतिनिधी) : रोटरी क्लब जळगाव च्या ई-लर्निंग ऑनगोइंग प्रोजेक्ट अंतर्गत गरजू व उत्तम काम करणाऱ्या संस्थांना कॉम्प्युटर भेट देण्यात येतात. काल समता नगर येथील वर्धिष्णू सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटी संचलित आनंदघर या शाळेसाठी स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने अंदाजे ३५० विद्यार्थ्यांच्या स्किल डेव्हलपमेंट साठी रोटरी क्लबच्या माध्यमातून कंप्यूटर या शाळेस भेट देण्यात आला.

अद्वैत दंडवते व प्रणाली दंडवते या पती पत्नीच्या अथक प्रयत्नातून आनंदघर ही शाळा उभी राहिली असून या संस्थेच्या माध्यमातून शहरातील विविध भागात सुमारे ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जळगाव शहरात कचरा उचलणाऱ्या महिला व पुरुष यांच्या पाल्यांसाठी शिक्षणाचे अतिशय उत्तम असे कार्य या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. तेथील विद्यार्थी विद्यार्थिनींना कॉम्प्युटर चे शिक्षण मिळावे या हेतूने रोटरी क्लबने प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढाकार घेतला व चांदोरकर प्रतिष्ठानच्या सहकार्याने हा कॉम्प्युटर भेट दिला.

याप्रसंगी प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर, रोटरी क्लब चे अध्यक्ष सागर चित्रे, सचिव पराग अग्रवाल, आनंदघरच्या संचालिका प्रणाली दंडवते, डॉ. शुभदा कुलकर्णी, कॅप्टन मोहन कुलकर्णी, आनंदघरच्या शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. कॉम्प्युटर भेट दिल्यामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल असे सांगताना प्रणाली दंडवते यांनी रोटरी क्लब जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठानचे आभार व्यक्त केले.

Next Post
श्री गजानन महाराज बहुउद्देशिय संस्थेतर्फे सामूहिक पारायणाला सुरुवात

श्री गजानन महाराज बहुउद्देशिय संस्थेतर्फे सामूहिक पारायणाला सुरुवात

ताज्या बातम्या

गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना
Uncategorized

गोदावरी फाऊंडेशनच्या आरोग्य संस्थांमध्ये भक्तिमय वातावरणात गणरायाची स्थापना

September 15, 2026
गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान
आरोग्य

गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त जामनेरमध्ये रक्तदान शिबिर; १०९ रक्तदात्यांचे योगदान

September 15, 2026
कासोदा येथून चोरलेल्या २३ शेळ्या-बोकडांचा मध्यप्रदेशात माग 
गुन्हे

कासोदा येथून चोरलेल्या २३ शेळ्या-बोकडांचा मध्यप्रदेशात माग 

September 15, 2026
सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध

September 15, 2026
गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या
गुन्हे

गणपती स्थापनेच्या तयारीत असतानाच विवाहितेची मुलासह आत्महत्या

September 15, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
जळगाव जिल्हा

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add