• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत धरणगाव तालुक्यातील 54 लाभार्थ्यांना मदतीचे वाटप

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 1, 2021
in जळगाव जिल्हा
0
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत धरणगाव तालुक्यातील 54 लाभार्थ्यांना मदतीचे वाटप

जळगाव (जिमाका) दि. 01 – घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने होणारी हानी अपरिमित आहे. हे दुःख पेलून कुटुंबासाठी नव्या उमेदीने वाटचाल करावी. यासाठी राज्य शासन आणि या विधवा महिलांचा भाऊ म्हणून मी आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

धरणगाव तालुक्यातील 52 विधवांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत प्रत्येकी 20 हजार तर आत्महत्याग्रस्त दोन शेतकर्‍यांच्या पत्नींना प्रत्येकी एक लाखाच्या मदतीचे वाटप आज धरणगाव येथे पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 18 ते 59 वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना एक महिन्याच्या आत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत एकरकमी 20 हजारांचा अर्थसहाय्याचा धनादेश दिला जातो. या अंतर्गत धरणगाव तालुक्यातील 52 महिलांना प्रत्येकी 20 हजार याप्रमाणे एकूण 10 लाख 40 हजार रूपयांचे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी प्रास्ताविकात या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती विशद केली.

यात तालुक्यातील रेल, पाळधी, पिंप्री, वराड, भोद, बोरखेडा, पिंपळे, गारखेडा, नांदेड, सोनवद, विवरे, साकरे, गंगापुरी, झुरखेडा, हनुमंतखेडा, भवरखेडा, हिंगोणे, चांदसर, कल्याणे, चावलखेडा, जांभोरे व फुलपाट येथील महिलांचा समावेश होता. याप्रसंगी दिवाळी सणानिमित्त पालकमंत्री यांच्या हस्ते या महिलांना मिठाई आणि साडी भेट देण्यात आली. तसेच तालुक्यातील आत्महत्याग्रस्त 2 शेतकर्‍यांच्या पत्नींनाही शासकीय नियमानुसार प्रत्येकी एक लाख रूपयांची मदत आणि पिठाची गिरणी देण्यात आली.

या सर्व 54 महिलांचे संजय गांधी निराधार योजनेतंर्गत मदतीचा प्रस्ताव सादर करून त्यास लवकरात लवकर मंजूरीचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. या कार्यक्रमाला गुलाबराव वाघ, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, पी. एम. पाटील, राजेंद्र महाजन, पप्पू भावे, भगवान महाजन, भानुदास विसावे आदी उपस्थित होते.

Next Post
शिवसेनेतर्फे कोविड लसीकरण आपल्या दारी उपक्रम संपन्न

शिवसेनेतर्फे कोविड लसीकरण आपल्या दारी उपक्रम संपन्न

ताज्या बातम्या

उपमहापौरांचा कडक पवित्रा: नवीन घरांच्या मॅपिंग आणि घरपट्टी आकारणीत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!
जळगाव जिल्हा

उपमहापौरांचा कडक पवित्रा: नवीन घरांच्या मॅपिंग आणि घरपट्टी आकारणीत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!

May 22, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !
शैक्षणिक

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

May 22, 2026
स्तनातील गाठीच्या त्रासाने त्रस्त ५५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

स्तनातील गाठीच्या त्रासाने त्रस्त ५५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

May 21, 2026
अनुकूल अहवालासाठी दीड लाखांची लाच घेताना उपनिबंधक बारीसह खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात!
गुन्हे

अनुकूल अहवालासाठी दीड लाखांची लाच घेताना उपनिबंधक बारीसह खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात!

May 20, 2026
‘विनोबा’तर्फे जिल्हास्तरीय ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कार सोहळा उत्साहात; गुणवंत शिक्षकांचा गौरव
जळगाव जिल्हा

‘विनोबा’तर्फे जिल्हास्तरीय ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कार सोहळा उत्साहात; गुणवंत शिक्षकांचा गौरव

May 20, 2026
NEET पेपरफुटी प्रकरण : जळगावात ‘महाविकास आघाडी’च्या युवक संघटना आक्रमक; एम. जे. कॉलेजसमोर आंदोलन
जळगाव जिल्हा

NEET पेपरफुटी प्रकरण : जळगावात ‘महाविकास आघाडी’च्या युवक संघटना आक्रमक; एम. जे. कॉलेजसमोर आंदोलन

May 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group