जळगाव, दि. 03 – माजी खासदार व आमदार तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दिवंगत हरीभाऊ जावळे यांना जयंतीनिमित्त आज पक्षातर्फे अभिवादन करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
माजी खासदार आणि आमदार तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष दिवंगत हरीभाऊ जावळे यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवारी पक्षातर्फे जीएम फाऊंडेशन येथे कार्यक्रमात त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा उज्वला बेंडाळे यांनी हरीभाऊ जावळे यांच्या कार्याची माहिती देत पक्षासाठी त्यांनी मोठे काम केले असल्याचा गौरव केला. तर अन्य वक्त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, शहर चिटणीस राधेश्याम चौधरी, गटनेता भगत बालाणी, अरविंद देशमुख, राजेंद्र चौधरी, आनंद सपकाळे, विठोबा चौधरी, अतुलसिंह हाडा, भगतसिह निकम, प्रकाश पंडित, प्रमोद वाणी, स्नेहा निंभोरे, संजय सोनवणे, रवि महाजन, सुरेश चौधरी, आकाश चौधरी, मनोज बडगुजर, गजानन वंजारी, मुकेश चौधरी, अमोल सोनवणे आदींची उपस्थिती होती.