जळगाव, (प्रतिनिधी) : श्री. संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विद्यालयात ‘डॉ.अब्दुल कलाम साहेब पुस्तक पेढी’ चे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ शिक्षिका शितल कोळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये ‘वाचन संस्कृती वाचवा’ या विषयावर उपशिक्षिका रूपाली आव्हाड यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर विद्यालयात ‘उत्कृष्ट वाचन’ हि स्पर्धा घेण्यात आली. यात मुलांनी त्यांच्या आवडत्या कथा, कवितांचे वाचन केले.
या स्पर्धेत इयत्ता तिसरी तील राधिका दांडगे व कावेरी पाटील या विद्यार्थिनींना ‘उत्कृष्ट वाचन’केले म्हणून बक्षीस देण्यात आले. पुढील काळामध्ये वाचनसंस्कृती विकसित व्हावी, या दृष्टीने विद्यालयात विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी याप्रसंगी घोषित केले. सर्व विद्यार्थ्यांना वाचन शपथ देण्यात आली. कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.