• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जवानाच्या अंगावर वीज पडून मृत्यू ! ; पाचोरा तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 10, 2024
in जळगाव जिल्हा
0
जवानाच्या अंगावर वीज पडून मृत्यू ! ; पाचोरा तालुक्यातील घटना

पाचोरा, (प्रतिनिधी) : सुट्टीवर आलेल्या ३४ वर्षीय बी.एस.बी. जवानाचा शेत शिवारातुन घरी येताना वाहनावर असताना अंगावर वीज पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना पाचोरा तालुक्यातील भातखंडे खुर्द शेत शिवारात सायंकाळच्या सुमारास घडली आहे.

पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली नं. ३ येथील भुषण आनंदा बोरसे (वय ३४) हे बिहार येथे एस.एस.बी. मध्ये सेवा बजावत होते. भूषण बोरसे हा गेल्या आठ वर्षांपूर्वी एस.एस.बी.सिमा सुरक्षा बलामध्ये भर्ती झालेला होता. पाच वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. जवान भूषण बोरसे याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, ४ वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. दरम्यान अवघ्या दोन दिवसांपुर्वीच भुषण बोरसे हे दिवाळीनिमित्त सुट्टी घेवुन घरी आले होते. सद्यस्थितीत नवरात्रीचा उत्सव सुरु असल्याने भुषण बोरसे हे ९ आॅक्टोबर रोजी त्यांच्या पत्नीसह पेंडकाई मातेच्या दर्शनाला गेले होते. दुपारी पेंडकाई मातेचे दर्शन घेवुन परतल्यानंतर भुषण बोरसे हे त्यांचे भातखंडे खुर्द शिवारात असलेल्या शेतात वडिलांना मदत करण्यासाठी गेले होते.

शेतात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले असतांनाच सायंकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास वडिलांना बैलगाडी जुपुंन देत भुषण बोरसे हे स्वतः मोटरसायकलवरुन बैलगाडी मागे येत असतांनाच जोरात विजांचा गडगडाट झाला. क्षणार्धातच भुषण बोरसे हे मोटरसायकलवरुन जमिनीवर कोसळून त्यांचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाला. हा संपूर्ण प्रकार भुषण बोरसे यांच्या वडिलांच्या डोळ्यासमोर झाल्याने आनंदा बोरसे यांनी एकच हंबरडा फोडला.

ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी शेतात धाव घेतली यावेळी भूषण बोरसे यांना रुग्णालयात देण्यात आले त्या ठिकाणी त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. यामुळे पाचोरा तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Next Post
घरात घुसून २४ वर्षीय विवाहितेवर अत्याचार ; जळगावातील घटना

घरात घुसून २४ वर्षीय विवाहितेवर अत्याचार ; जळगावातील घटना

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add