जळगाव, (प्रतिनिधी ) : शहरातील हरी विठ्ठल नगर परिसरात राहणाऱ्या एका २४ वर्षीय महिलेच्या घरात घुसून जबरदस्तीने अत्याचार करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री २ वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.
▪️आजचा रंग- गुलाबी 👇
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, हरी विठ्ठल नगर परिसरातील रेल्वे पुलाजवळ राहणाऱ्या एका २४ वर्षीय महिला झोपलेली असताना तोंड दाबून तिच्यावर जबरीने मंगेश उर्फ मंगलदास अंबादास कोळी ( वय ४० रा. हरी विठ्ठल नगर) याने जबरदस्तीने अत्याचार करून तुला मारून टाकेल अशी धमकी दिली.
याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी मंगेश उर्फ मंगलदास अंबादास कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तपास विठ्ठल पाटील करीत आहे.