• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नवविवाहितेची आत्महत्या: जळगाव तालुक्यातील लमांजन येथील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 14, 2025
in जळगाव जिल्हा
0
नवविवाहितेची आत्महत्या: जळगाव तालुक्यातील लमांजन येथील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील लमांजन येथे सोमवारी (दि. १४ जुलै) दुपारी २ वाजेच्या सुमारास एका तरुण नवविवाहितेने राहत्या घरी साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. अश्विनी गणेश पाटील (वय १९, रा. लमांजन) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. या घटनेने लमांजन गावात शोककळा पसरली असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अश्विनी पती गणेश पाटील आणि सासू यांच्यासोबत लमांजन येथे राहत होती. तिचे पती गणेश पाटील हे मेरिको कंपनीत कामगार आहेत, तर तिचे माहेर गावातच असून वडील सुधाकर पाटील शेती करतात. सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास अश्विनीची सासू शेतातील कामे आटोपून घरी परतल्या. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता, अश्विनीने दरवाजा उघडला नाही. खिडकीतून डोकावून पाहिले असता, अश्विनीने साडीने गळफास घेतल्याचे धक्कादायक दृश्य त्यांना दिसले.

सासूने आवाज दिल्यानंतर शेजारील नागरिक धावत आले. ग्रामस्थांनी तातडीने अश्विनीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान अश्विनीच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.


 

Next Post
चुकीचा किडनी अहवाल देणारे चोपडा येथील डॉ. उमेश कोल्हे निलंबित

चुकीचा किडनी अहवाल देणारे चोपडा येथील डॉ. उमेश कोल्हे निलंबित

ताज्या बातम्या

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव जिल्हा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 25, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 25, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २२ वर्षीय संशयिताला अटक

August 25, 2026
आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
खान्देश

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add