महावीर ज्वेलर्सचे संचालकअजय ललवाणी अध्यक्षपदी
जळगाव (प्रतिनिधी ) २४ वे जैन तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या २५५० व्या निर्वाण कल्याणक महोत्सवा निमित्त, महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय समितीच्या वतीने, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा समिती गठीत करण्यात आलेली आहे. या अंतर्गत जळगाव जिल्हा समितीच्या अध्यक्षपदी जळगावातील महावीर ज्वेलर्सचे संचालक समावेश आहे.
भगवान महावीर स्वामी यांच्या निर्वाण कल्याणक महोत्सवा अंतर्गत जळगाव जिल्ह्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानमाला, जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. या सबंध कार्यक्रमांच्या प्रभावी आयोजनासाठी, राज्यस्तरीय समितीच्या निर्देशानुसार विविध विभागांशी समन्वय राखण्याची जबाबदारी या जिल्हा समितिकडे सोपवण्यात आलेली आहे. जिल्हा समिति गठनाची ही प्रक्रिया मंगलप्रभात लोढ़ा यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. महोत्सवांतर्गतच्या सर्व कार्यक्रमांसाठी संबंधित सर्व विभागांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री अजय ललवाणी यांनी केले आहे