अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता
जळगाव, (प्रतिनिधी) : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेला शब्द पाळल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा मतदार संघातील नागरिकांना आला आहे. तालुक्यातील म्हसावद येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे आता म्हसावदसह परिसरातील रुग्णांची मोठी सोय होणार आहे.
म्हसावदसह परिसरातील रुग्णांचे शासकीय रूग्णालया अभावी मोठी गैरसोय होत होती. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शब्द दिला होता की, म्हसावद येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात येईल. त्यानुसार गुलाबभाऊंनी आपला शब्द पाळला असून म्हसावद येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामासाठी ३४५२.१४ लक्ष रुपये एवढ्या रक्कमेच्या अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता शासनाकडून मिळवून आणली आहे.
म्हसावद येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाची मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामाचे अंदाजपत्रक सन २०२२-२३ च्या दरसूचीवर आधारित आहे. या अंदाजपत्रकात प्रस्तावित इमारतीपैकी रुग्णालय इमारत (G+१) अशी प्रस्तावित असून त्याचे क्षेत्रफळ ४९०१.५९ चौ.मी. इतके आहे. तसेच निवासस्थाने इमारत यामध्ये टाईप ४ (२ निवासस्थाने) (क्षेत्रफळ २४०.२४ चौ.मी.), टाईप ३ (४ निवासस्थाने) (क्षेत्रफळ ३१२.०० चौ.मी.), टाईप २ (८ निवासस्थाने) (क्षेत्रफळ ५४९.१२ चौ. मी.), टाईप १ (१५ निवासस्थाने) (क्षेत्रफळ ७९५.६० चौ. मी.) याप्रमाणे निवासस्थान इमारतींचे एकुण क्षेत्रफळ १८९६.९६ चौ.मी. इतके आहे.
या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ६७९८.५५ चौ.मी. असून बांधकामाचा दर रु. २८००० प्रति चौ. मी. आहे. उक्त बांधकामाची कार्यान्वयीन यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. या अंदाजपत्रकामध्ये विद्युतीकरण, पाणी पुरवठा व मलः निस्सारण, आग प्रतिबंधक, अंतर्गत रस्ता, फर्निचर, पार्कीग, भू- विकास, लिप्ट, वाताकुलीत यंत्रणा इ. साठी तरतूद करण्यात आली असून सोबत जोडण्यात आलेल्या Recapitulation sheet प्रमाणे इमारत बांधकामाच्या रु. ३४५२.१४ लक्ष किंमतीच्या, अंदाजपत्रक व आराखड्यांना अटी व शर्तीच्या अधिन राहून शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.