• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात अवैध कुंटणखान्यावर धाड ; पाच महिलांची सुटका

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 28, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगावात अवैध कुंटणखान्यावर धाड ; पाच महिलांची सुटका

जळगाव (प्रतिनिधी ) : एमआयडीसी पोलिसांनी शहरातील एमआयडीसी भागातील जी-सेक्टरमध्ये सागर हॉटेल व लॉजिंग येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकून कारवाई २७ ऑगस्ट रोजी रात्रीकेली असून या प्रकरणीएमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत ५ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

जळगाव एमआयडीसीतील सेक्टर जी सेक्टरमध्ये असलेले सागर हॉटेल व लॉज येथे बेकायदेशीर पध्दतीने कुंटणखाना सुरू असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता छापा टाकला. या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. पोलीस कॉन्स्टेबल सपना येरगुंटला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेलचे मालक सागर नारायण सोनवणे रा. जळगाव आणि चालक सागर सुधाकर पाटील या दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर, पोलीस नाईक विकास सातदिवे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनंदा तेली, पोहेकॉ मुकुंदा पाटील, रामदास कुंभार, विनोद भास्कर, भरत डोके यांच्यासह इतरांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.

Tags: CrimeJalgaonJalgaon Crime
Next Post
हृदयद्रावक : भरधाव ट्रकने दुचाकीवरील महिलांना चिरडले ! ; चिमुकला जखमी

हृदयद्रावक : भरधाव ट्रकने दुचाकीवरील महिलांना चिरडले ! ; चिमुकला जखमी

ताज्या बातम्या

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add