• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावच्या कानळदा रोडवर मालवाहू वाहनाचा एक्सल तुटल्याने अपघात; १९ जण जखमी !

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 25, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगावच्या कानळदा रोडवर मालवाहू वाहनाचा एक्सल तुटल्याने अपघात; १९ जण जखमी !

जळगाव (प्रतिनिधी) : मध्य प्रदेशात आयोजित सत्संग कार्यक्रमासाठी निघालेल्या आदिवासी बांधवांच्या प्रवासाला अपघाताचे गालबोट लागले. जळगाव तालुक्यातील कानळदा रोडवर बडे जटाधारी बाबा महादेव मंदिराजवळ ४०७ मालवाहू वाहनाचा मागील चाकाचा एक्सल अचानक तुटल्याने वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर वाहन दोन वेळा पलटी झाले. या दुर्घटनेत लहान मुलांसह १९ जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास घडली.

सत्संगासाठी जात असताना काळाचा घाला..
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील वराड सिम, कुऱ्हा, मोंढाळा, खंडाळा, सिंधी आणि मांडवा परिसरातील आदिवासी बांधव मध्य प्रदेशात होणाऱ्या सत्संग कार्यक्रमासाठी निघाले होते. यासाठी त्यांनी ४०७ मालवाहू वाहनातून प्रवास सुरू केला होता. ममुराबाद रोडमार्गे चोपडा आणि त्यानंतर मध्य प्रदेशाच्या दिशेने जात असताना कानळदा रोडवरील बडे जटाधारी बाबा महादेव मंदिराजवळ वाहनाच्या मागील चाकाचा एक्सल अचानक तुटला.

वाहनाचा एक्सल तुटताच चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्यावर दोन वेळा पलटी झाले. या घटनेमुळे वाहनातील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. वाहनात सुमारे २० ते २५ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती असून, मालवाहू वाहनातून प्रवास करताना क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते का, याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

महिला आणि लहान मुलांचाही समावेश..
अपघाताची माहिती मिळताच जखमींना मदत करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. शासकीय रुग्णवाहिकांसह खासगी वाहनांच्या मदतीने जखमींना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश आहे.

जखमींची नावे..
या अपघातात कमल बारेला (२५), सुरेश देवसिंग बारेला (४०), रवींद्र सिताराम मोरे (१२), प्रवीण सिताराम मोरे (११), सईती मगन मोरे (७), नवलसिंग सिताराम मोरे (२५), रूपाली सावरिया बारेला (१८), रमेश धनसिंग बारेला (२८), राजाराम बारेला (४०), रितेश खुलसिंग बारेला (२३), पवन धासीलाल बारेला (८), विजय रेमला बारेला (२२), अर्जुन राजाराम बारेला (१८), सावरिया हिम्मत बारेला (३८), गांजीलाल बारेला (३०), सचिन बन्सीलाल बारेला (१५), बन्सीलाल चिनूसिंग बारेला (५५), सुनील दरबार बारेला (१५) आणि अजय गुडिया बारेला (१५) हे १९ जण जखमी झाले आहेत.

अपघाताच्या कारणांचा तपास अपेक्षित..
सत्संगासाठी निघालेल्या आदिवासी बांधवांच्या वाहनाला झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वाहनाचा एक्सल तुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, वाहनाची तांत्रिक स्थिती, प्रवासी वाहतुकीचे नियम पाळले गेले होते का आणि अपघाताची नेमकी कारणे काय होती, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेबाबत अद्याप पोलिसांत नोंद झालेली नव्हती.


 

Next Post
सिंचन क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले नेते म्हणजे अजितदादा! – अशोक जैन

सिंचन क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले नेते म्हणजे अजितदादा! – अशोक जैन

ताज्या बातम्या

सिंचन क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले नेते म्हणजे अजितदादा! – अशोक जैन
खान्देश

सिंचन क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले नेते म्हणजे अजितदादा! – अशोक जैन

October 25, 2026
जळगावच्या कानळदा रोडवर मालवाहू वाहनाचा एक्सल तुटल्याने अपघात; १९ जण जखमी !
गुन्हे

जळगावच्या कानळदा रोडवर मालवाहू वाहनाचा एक्सल तुटल्याने अपघात; १९ जण जखमी !

October 25, 2026
जेवण बनवून न दिल्याच्या रागातून आईची हत्या ; येवतीतील घटनेने खळबळ
गुन्हे

जेवण बनवून न दिल्याच्या रागातून आईची हत्या ; येवतीतील घटनेने खळबळ

October 25, 2026
किनगावमध्ये आरएसएसच्या पथसंचलनाला विरोध; दगडफेकीनंतर पोलिसांचा सौम्य लाठीमार
गुन्हे

किनगावमध्ये आरएसएसच्या पथसंचलनाला विरोध; दगडफेकीनंतर पोलिसांचा सौम्य लाठीमार

October 25, 2026
‘स्टार सिनेमा’मध्ये आणखी दोन अत्याधुनिक स्क्रीन सज्ज; प्रेक्षकांसाठी मल्टिप्लेक्सचा विस्तार
जळगाव जिल्हा

‘स्टार सिनेमा’मध्ये आणखी दोन अत्याधुनिक स्क्रीन सज्ज; प्रेक्षकांसाठी मल्टिप्लेक्सचा विस्तार

October 24, 2026
जळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे उद्या आयोजन
क्रिडा

जळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे उद्या आयोजन

October 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add