• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

म्हशी चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 28, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
शेतकऱ्याची ३५ हजारांची रोकड लांबविली

जळगाव तालुक्यातील कडगाव येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :  पुलाच्या बांधकामासाठी केलेल्या खड्ड्यात बुडून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कडगाव ते जोगलखेडा रस्त्यावर मंगळवारी दिनांक २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संतोष यादव धनगर (वय-५५,रा.कडगाव ता. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्यातील कडगाव येथे संतोष धनगर हे पत्नी आणि मुलासह वास्तव्याला होते. शेतीकाम व पशुपालन करून ते उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी ते म्हशी चारण्यासाठी गेले होते. त्यानंतर सायंकाळी परत येत असताना जोगलखेडा ते कडगाव रस्त्यावरील पुलाचे काम करण्यासाठी केलेल्या खड्ड्यात त्यांच्या म्हशी गेल्या होत्या.

पाण्यात गेलेल्या म्हशी या गाळात बसल्याने त्यांना काढण्यासाठी संतोष धनगर हे गेले असता ते देखील गाळात फसले. दरम्यान घरी म्हशी काही परत आल्या. पण वडील घरी आले नाही. म्हणून मुलाने शोधाशोध केली तेव्हा त्यांना गाळामध्ये संतोष धनगर यांनी सोबत नेलेली पाण्याची बाटली दिसून आली. त्यावरून त्यांना गाळात असल्याचा अंदाज आला.

गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन संतोष धनगर यांना खड्ड्यातील पाण्यातून बाहेर काढले. यावेळी संबंधित ठेकेदाराने हे काम अपूर्ण ठेवल्यामुळे एकच संताप व्यक्त केला होता. या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी मालती, मुलगा जयेश असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags: Crime
Next Post
जळगावात अवैध कुंटणखान्यावर धाड ; पाच महिलांची सुटका

जळगावात अवैध कुंटणखान्यावर धाड ; पाच महिलांची सुटका

ताज्या बातम्या

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव जिल्हा

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 23, 2026
यूट्यूब चैनलच्या संपादकासह दोघांवर गुन्हा दाखल; स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा दावा भोवला
महाराष्ट्र

यूट्यूब चैनलच्या संपादकासह दोघांवर गुन्हा दाखल; स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा दावा भोवला

July 23, 2026
एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add