कल्याण (वृत्तसंस्था ) ;-बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आदर्श शाळेतील तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतल्याच कार्मचाऱ्यानं अत्याचार केल्याचा धक्कादायक घटनेने महाराष्ट्र हादरला आहे . अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेच्या २४ तासांत पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याला कोर्टात हजर केले असता, २५ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडीत सुनावली आहे. त्याने असे अनेक गुन्हे केल्याचा पोलिसांना संशय असून त्याने हे कृत्य कसं केलं याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पोलिस कोठडी मागीतली असून कोर्टाने ती मान्य केली. विशेष महिला पोक्सो न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी हा निर्णय दिला आहे.
अल्पवयीन मुलींना न्याय मिळावा या मागणीसाठी मंगळवारी शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले. आंदोलक आरोपी अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी काल बदलापूर येथे मोठे आंदोलन झाले.
यावेळी विशेष सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी युक्तीवाद केला. यावेळी पोलिसांनी आरोपीने केलेले कृत्य याबाबत तपास करायचा असल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदेला 17 ऑगस्टला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने 21 ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर आज पुन्हा आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी कल्याण न्यायालयाने तपासातंर्गत 24 ऑगस्टपर्यंत ही पोलीस कोठडी वाढवली आहे.
कल्याण न्यायालयात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयात हजर करण्यापूर्वी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.